बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमीचा चार वर्षीय मुलगा अयानला कॅन्सर झाला आहे. त्याचा कॅन्सर पहिल्याच स्टेजमध्ये असल्याचे उघडकिस आले असून, सध्या त्याच्यावर उपचार चालू आहे. पण, केमोथेरपीसाठी त्याला परदेशी पाठवण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
१५ जानेवारीला अयानवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेत त्याच्या किडनीमध्ये असलेली गाठ काढण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अयानला आज (सोमवार) डिस्चार्ज मिळणार असून, केमोथेरपीसाठी त्याला परदेशात पाठविले जाऊ शकते.  

क्रिकेटर युवराज सिंहच्या कॅन्सरवर केमोथेरपीनेच उपचार करण्यात आला होता. त्याची शस्त्रक्रिया अमेरिकेत झाली होती. युवराजने अयानवरही तिथेच उपचार करण्याचा सल्ला इमरानला दिला आहे.