बॉलीवूड अभिनेता इम्रान हाश्मी याचा चार वर्षाचा मुलगा अयान याच्या मूत्रपिंडाच्या कर्करोगावर आज (बुधवार) यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मूत्रपिंडाचा कर्करोग असल्याचे निष्पन्न झाल्यावर आयनला हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
इम्रान हाश्मीने माहिती देताना सांगितले की, अयानवरील शस्त्रक्रीया यशस्वीरित्या पार पडली आहे. आयन अतिशय धीट व्यक्तीमत्वाचा आहे. त्यामुळे इतक्या लहान वयात तो यशस्वीरित्या शस्त्रक्रीयेला सामोरा गेला. कृपया अयानसाठी प्रार्थना करा एवढेच म्हणेन.
शस्त्रक्रीया यशस्वी झाल्याचे समजताज दिग्दर्शिका फराह खान यांनी अयानवरील शस्त्रक्रीया यशस्वी झाल्याचे समजले ऐकून आनंद झाला. त्याच्या प्रकृतीसाठी माझ्याही मुलांनी प्रार्थना केली होती. तुम्हीही करा असे ट्विट केले आहे.
इम्रानने आपला आगामी चित्रपट ‘मिस्टर एक्स’साठीच्या चित्रिकरणाचा दक्षिण आफ्रीकेतील नियोजित कार्यक्रम रद्द केला आहे. अयान संपूर्णपणे बरा झाल्यानंतरच चित्रिकरणाला जाणार असल्याचे इम्रान म्हणाला. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा