अभिनयाची आवड असल्याने आपल्या चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडून या क्षेत्रात संघर्ष करून यश मिळवणारे अनेक कलाकार आहेत. असाच एक अभिनेता आहे, जो एकेकाळी इंजिनिअर होता. त्याने अभिनयासाठी त्याची चांगल्या पगाराची आयटी क्षेत्रातील नोकरी सोडली. अभिनयाची आवड जोपासण्यासाठी तो सिनेक्षेत्रात आला आणि आपल्या मेहनत व कौशल्याच्या जोरावर अनेक अविस्मरणीय चित्रपट दिले आहेत. आता तो मल्याळम चित्रपट उद्योगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपण ज्या अभिनेत्याबद्दल बोलतोय त्याचं नाव टोविनो थॉमस आहे. त्याचा जन्म थ्रिसूरमधील इरिंजलाकुडा इथं झाला. त्याचे वडील एल्लिकल थॉमस वकील आहेत. त्याच्या आईचं नाव शीला थॉमस आहे. टोविनोने तामिळनाडू कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, कोईम्बतूर इथून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये डिग्री घेतली आणि नंतर कॉग्निझंट टेक्नॉलॉजीजमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करू लागला.

अवघ्या २० कोटींचं बजेट अन् कमावले २२५ कोटी, एकही अभिनेत्री नसलेला ‘हा’ सिनेमा ओटीटीवर होणार प्रदर्शित

नोकरी सोडली अन् सिनेसृष्टीत आलो – टोविनो

टोविनोने एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्याला चित्रपटांमध्ये नशीब आजमावण्यासाठी फक्त एक वर्ष मिळालं होतं. “मला चित्रपटांची आवड होती, पण त्याबद्दल आई-वडिलांना सांगायला मला भीती वाटत होती. मी इंजिनीअरिंग पूर्ण केल्यावर मला लगेच नोकरी मिळाली आणि मी चांगले पैसे कमवत होतो. पण मला माझ्या स्वप्नांमागे धावायचं होतं, मला चित्रपटांमध्ये काम करायचं होतं. माझे इंडस्ट्रीत मित्र नव्हते, कोणीही ओळखीचं नव्हतं, पण मला प्रयत्न करून पाहायचा होता. सुरुवातीला माझे आई-बाबा मला फार पाठिंबा देत नव्हते, त्यांनी मला चित्रपटांमध्ये नशीब आजमावण्यासाठी एक वर्ष दिलं, तर मी माझी नोकरी सोडली आणि या क्षेत्राकडे वळलो,” असं टोविनो इ टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला होता.

गोविंदाच्या भाचीने सोडला हिंदू धर्म? अभिनेत्री रागिनी खन्ना धर्मांतराच्या ‘त्या’ पोस्टबद्दल म्हणाली, “मी माझा धर्म…”

असिस्टंट डायरेक्टर म्हणून केलं काम

नोकरी सोडल्यानंतर जवळ पैसे नव्हते, त्यामुळे भावाकडून मदत घेतली. पण फार काळ त्याच्यावर अवलंबून राहणं शक्य नव्हतं, त्यामुळे असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करू लागलो, असं टोविनो सांगितलं होतं. ‘प्रभुविंते मक्कल’ या २०१२ साली आलेल्या चित्रपटातून टोविनोने शानदार पदार्पण केलं होतं. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता, पण तरीही त्याच्या करिअरने म्हणावा तसा वेग धरला नाही, त्यामुळे त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करणं सुरूच ठेवलं. नंतर त्याला चित्रपटांच्या संधी मिळत गेल्या आणि त्याने मागे वळून पाहिलं नाही.

बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी

टोविनो थॉमस आता मल्याळम सिनेइंडस्ट्रीतील सुपरस्टार झाला आहे. त्याने ‘२०१८’, ‘मिन्नल मुरली’, ‘व्हायरस’, ‘एबीसीडी’, ‘गोधा’, ‘ल्युसिफर’ यासारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. टोविनो हा सर्वाधिक मानधन घेणाऱ्या मल्याळम अभिनेत्यांपैकी एक आहे. तो एका चित्रपटासाठी चार कोटी रुपये मानधन घेतो.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Engineer turned actor tovino thomas left high paying it job for acting journey of struggle becoming superstar hrc
Show comments