Entertainment Live News Today, 23 April 2025 : सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारचा ‘केसरी चॅप्टर २’ आणि सनी देओलचा ‘जाट’ चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहेत. तसंच मराठीमध्ये ‘सुशीला-सुजीत’, ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’, ‘अशी ही जमवा जमवी’, ‘जयभीम पँथर’सारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळत आहेत. येत्या काळात ‘झापुक झुपूक’ आणि ‘देवमाणूस’ यांसारखे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. दुसऱ्या बाजूला काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याविषयी कलाकार मंडळी संतप्त भावना व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर कलाकार मंडळी पोस्ट करून हल्ल्याविषयी आपलं परखड मत मांडत आहेत. त्यामुळे आजच्या दिवसभरातील सिनेसृष्टी आणि मालिकाविश्वातील सर्व अपडेट्स जाणून घ्या…

Live Updates

Manoranjan Live News Updates : मनोरंजनविश्वातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या...

15:36 (IST) 23 Apr 2025

ऋजुता देशमुखच्या लेकीचं मनोरंजन क्षेत्रात पदार्पण, पहिल्या चित्रपटाबद्दल आईने व्यक्त केल्या भावना, म्हणाली, "मुलीचं कौतुक…"

Rujuta Deshmukh : ऋजुता देशमुखच्याने लेकीच्या पहिल्या चित्रपटाबद्दल व्यक्त केल्या भावना, साजिरीनेही व्यक्त केली उत्सुकता ...वाचा सविस्तर
15:33 (IST) 23 Apr 2025

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यावर शाहरुख खान काय म्हणाला? वाचा..

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर कलाकार मंडळी सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त करत आहेत. यासंदर्भात नुकतीच शाहरुख खानने इ्न्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. त्याने लिहिलं की, पहलगाममध्ये घडलेल्या विश्वासघातकी, अमानवीय हिंसाचाराबद्दल दुःख आणि संताप शब्दात व्यक्त करू शकत नाही. अशा वेळी फक्त देवा पुढे पीडित कुटुंबासाठी प्रार्थना करू शकतो आणि माझा शोक व्यक्त करू शकतो. एक राष्ट्र म्हणजे आपण एकजूट करून उभे राहू आणि या घृणास्पद कृत्याविरुद्ध न्याय मिळवू या.

15:32 (IST) 23 Apr 2025
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यावर शाहरुख खान काय म्हणाला? वाचा...

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर कलाकार मंडळी सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त करत आहेत. यासंदर्भात नुकतीच शाहरुख खानने इ्न्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. त्याने लिहिलं की, पहलगाममध्ये घडलेल्या विश्वासघातकी, अमानवीय हिंसाचाराबद्दल दुःख आणि संताप शब्दात व्यक्त करू शकत नाही. अशा वेळी फक्त देवा पुढे पीडित कुटुंबासाठी प्रार्थना करू शकतो आणि माझा शोक व्यक्त करू शकतो. एक राष्ट्र म्हणजे आपण एकजूट होऊन उभे राहू आणि या घृणास्पद कृत्याविरुद्ध न्याय मिळवू.

15:09 (IST) 23 Apr 2025

"त्यांनी आपल्या लोकांना निर्दयीपणे मारले…", पहलगाम हल्ल्यानंतर बॉलीवूड कलाकारांनी व्यक्त केल्या भावना; म्हणाले…

Bollywood actors on Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर बॉलीवूड कलाकारांनी व्यक्त केली हळहळ; काय म्हणाले? घ्या जाणून... ...सविस्तर वाचा
15:07 (IST) 23 Apr 2025

'बिग बॉस' आणि 'खतरों के खिलाडी' हे लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो कलर्स वाहिनीवर दिसणार नाहीत? काय आहे कारण?

Bigg Boss Khatron Ke Khiladi update: सलमान खानचा बिग बॉस शो कलर्स वाहिनीवर प्रदर्शित होणार नाही? ...सविस्तर बातमी
14:26 (IST) 23 Apr 2025

साताऱ्याची वेदांती भोसले आता 'लाफ्टर शेफ्स २' गाजवणार, अंकिता लोखंडेने शेअर केले फोटो; अमृता खानविलकर प्रतिक्रिया देत म्हणाली, "अगं बाई…"

साताऱ्याच्या वेदांती भोसलेचं हिंदी टेलिव्हिजनमध्ये पाऊल, पाहा अंकिता लोखंडेबरोबरचे सुंदर फोटो ...सविस्तर वाचा
14:22 (IST) 23 Apr 2025

'इमर्जन्सी'मुळे कंगणा रणौत कायदेशीर अडचणीत, लेखिकेकडून तथ्ये बदलल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Kangana Ranaut : कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' चित्रपट पुन्हा एकदा वादात, लेखिकेने केला तथ्ये बदलल्याचा आरोप, अधिक जाणून घ्या... ...सविस्तर बातमी
14:21 (IST) 23 Apr 2025

पहिल्या प्रेमाचा पहिला स्पर्श…; आदित्यची 'ती' इच्छा पूर्ण होणार, आजवर न पाहिलेल्या लूकमध्ये येणार 'पारू'! पाहा प्रोमो…

Paaru Serial : आदित्य अन् पारु अनुभवणार पहिल्या प्रेमाचा पहिला स्पर्श...; दोघांना कोण करणार मदत? पाहा प्रोमो... ...सविस्तर बातमी
14:21 (IST) 23 Apr 2025

पहिल्या प्रेमाचा पहिला स्पर्श…; आदित्यची 'ती' इच्छा पूर्ण होणार, आजवर न पाहिलेल्या लूकमध्ये येणार 'पारू'! पाहा प्रोमो…

Paaru Serial : आदित्य अन् पारु अनुभवणार पहिल्या प्रेमाचा पहिला स्पर्श...; दोघांना कोण करणार मदत? पाहा प्रोमो... ...सविस्तर बातमी
12:53 (IST) 23 Apr 2025
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्लावर हेमंत ढोमेने संताप केला व्यक्त, म्हणाला...

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हेमंत ढोमेने एक्स भावना व्यक्त केली. म्हणाला की, पहलगाम दहशतवादी हल्ला हा आपल्या 'देशावर' झालेला हल्ला आहे. राजकारण आणि धर्म बाजूला ठेऊन, आता गरज आहे एकत्र उभं राहण्याची…मृत नागरिकांच्या, त्यांच्या कुटुंबातील सगळ्यांच्या, आपल्या देशाच्या सैन्यदलाच्या, सुरक्षा दलाच्या, गृहमंत्री आणि पंतप्रधान सगळ्यांच्या पाठीशी...त्यांना त्यांचं काम करू दे…आपण देशहिताचं काम करूया...चिखलफेक थांबवूया...देश आधी, राष्ट्रहित आधी.

https://platform.twitter.com/widgets.js
12:32 (IST) 23 Apr 2025

Pahalgam Terror Attack : "पहलगाम नरसंहार अत्यंत भयानक आणि प्रचंड चीड आणणारा" - अंशुमन विचारे

पहलगाम हल्ल्यावर अभिनेता अंशुमन विचारेने नुकतीच पोस्ट शेअर केली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहित अंशुमन म्हणाला, "पहलगाम नरसंहार अत्यंत भयानक आणि प्रचंड चीड आणणारा आहे. याला कारणीभूत असलेल्या प्रत्येक देशद्रोही दहशतवाद्यांचा कायमचा नायनाट हीच श्रद्धांजली असेल. आता यात राजकारण नको. नाहीतर अजून सामान्य माणसाला बळी जावं लागेल. "

12:27 (IST) 23 Apr 2025

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्याचा पृथ्वीक प्रतापने केला निषेध

पहलगाम हल्ल्यावर पृथ्वीक प्रताप पोस्ट करत म्हणाला, "ह्या असल्या भ्याड आतंकवादी हल्लांचा निषेध"

12:08 (IST) 23 Apr 2025

मुस्लीम असूनही 'ही' बॉलीवूड अभिनेत्री हिंदू सणही करते साजरे; कारण सांगत म्हणाली…

"मला जे वाटतं ते मी करते", मुस्लीम असुनही हिंदू सण साजरे करण्याबद्दल प्रसिद्ध अभिनेत्रीचं वक्तव्य, म्हणाली... ...सविस्तर बातमी
12:05 (IST) 23 Apr 2025

"नाक्या-नाक्यावर चेकपोस्ट असताना या घटनास्थळी मात्र कुणीही नव्हते हे खूप संशयास्पद…", पहलगाम हल्ल्यावर किरण मानेंची पोस्ट, म्हणाले…

Pahalgam Terror Attack : किरण माने म्हणाले की, आपल्याला सगळ्यांना, सर्वधर्मीय नागरिकांना एक 'देश' म्हणून, एकजुटीनं भक्कमपणे उभं राहणं गरजेचं आहे... ...सविस्तर बातमी
11:40 (IST) 23 Apr 2025

आमिर खानला कानाखाली मारण्यासाठी १ लाख रुपयांचे बक्षीस…; राहुल भट्ट म्हणाला, "त्याने धूम्रपान…"

Rahul Bhatt on Aamir Khan: राहुल भट्ट आमिर खानबाबत काय म्हणाला? ...सविस्तर वाचा
11:30 (IST) 23 Apr 2025

"देशवासियांच्या मृत्यूची जबाबदारी कधी घेणार?", पहलगाम हल्ल्यावरुन प्रसिद्ध गायिकेची मोदी सरकारवर टीका, म्हणाली, "पंतप्रधान झाल्यापासून…"

Pahalgam Terrorist Attack : पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरुन प्रसिद्ध गायिकेने मोदी सरकारला घेरलं, व्हिडीओ शेअर करत म्हणाली... ...वाचा सविस्तर
11:17 (IST) 23 Apr 2025
Pahalgam Terror Attack : तेजस्विनी पंडित म्हणाली, "हे आपल्या भारत सरकारचं अपयश नाही?"

पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल कलाकार मंडळी सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त करत आहेत. नुकतीच तेजस्विनी पंडितने एक्स अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे. ज्यामधून तिने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तेजस्विनी म्हणाली, "अनेक प्रश्न मनात घिरट्या घालत आहेत…दहशतवाद्यांची जात दरवेळेला एकच कशी असते? हे हल्लेखोर तिथे स्थानिक मदतीशिवाय पोहोचू शकतात का? हिंदू राष्ट्रात, एक हाती हिंदू सरकारात इतर ही नाहीत पण हिंदूच सुरक्षित नाहीत? अशा घटना घडतात तेव्हा देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवर, इंटेलिजन्सवर विश्वास कसा ठेवायचा? हे आपल्या भारत सरकारचं अपयश नाही? 'त्या हरामखोरांकडून' सुधारायची अपेक्षा कधी थांबवणार आपण? इतक्या हल्ल्यांनंतरही 'त्यांच्या' घरात घुसून त्यांना का नाही मारत आहोत आपण?निष्पाप लोकांचा जीव गेला, त्यांच्या परिवाराचं सांत्वन कसं करणार आपण?असे अनेक प्रश्न…तुम्हालाही हे भेडसावतात? काळी रात्र, सुन्न मन!"

https://platform.twitter.com/widgets.js
10:57 (IST) 23 Apr 2025

दहशतवादी हल्ल्याच्या एक दिवसाआधी पहलगामध्ये होते दीपिका कक्कर व शोएब इब्राहिम, पोस्ट करत अभिनेता म्हणाला…

Pahalgam Terror Attack : काही दिवसांपूर्वी दीपिका कक्कर व शोएब इब्राहिम कुटुंबासह पहलगाममध्ये गेले होते सु्ट्टी एन्जॉय करायला पण... ...वाचा सविस्तर
09:40 (IST) 23 Apr 2025

Pahalgam Terror Attack : "मला उघडपणे घाण बोलायचं आहे", स्नेहल तरडेची पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर पोस्ट, म्हणाली...

प्रवीण तरडे यांच्या पत्नी अभिनेत्री, दिग्दर्शिका स्नेहल तरडेने पहलगाम येथील झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल नुकतीच पोस्ट शेअर केली आहे. स्नेहलने लिहिलं, "मला उघडपणे घाण बोलायचं आहे....खूप. एकांतात शिव्या देऊन मन शांत होणार नाही. त्यांनी उघडपणे गोळ्या झाडल्या आणि त्यांच्याबद्दल उघडपणे वाईट बोलायला विचार करावा लागतोय ही केवढी खेदाची बाब आहे."

https://www.instagram.com/p/DIxe8mkIxfB/

09:34 (IST) 23 Apr 2025

"शब्द आज नपुंसक…", पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अनुपम खेर हळहळले; म्हणाले, "द काश्मीर फाइल्स' चित्रपटात…"

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीर येथे झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर अभिनेते अनुपम खेर यांची प्रतिक्रिया, पंतप्रधान मोदींना हात जोडून केली विनंती, म्हणाले... ...सविस्तर वाचा
09:21 (IST) 23 Apr 2025
Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर अभिजीत केळकर नेमकं काय म्हणाला? वाचा...

गेल्या सहा वर्षांतील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला काश्मीरमधील पहलगाम येथे झाला. या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं. ज्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. त्यामुळे सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कलाकार मंडळींनीदेखील सोशल मीडियावर पोस्ट करत निषेध व्यक्त केला आहे. अभिनेता अभिजीत केळकरने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिलं की, "...आता सौहार्द नको. आता घुसा आणि नकाशा कायमचा बदलून टाका. भिकेला लागून सुद्धा, अजूनही खुमखुमी असलेल्या भिकारड्या पाकिस्तानला, आता बेचिराख करायलाच हवं."

https://www.instagram.com/p/DIxZJAjISy7/

09:18 (IST) 23 Apr 2025

Kesari Collection Day 5 : अक्षय कुमारच्या 'केसरी चॅप्टर २' चित्रपटाने पाचव्या दिवशी केली 'इतकी' कमाई

'स्काय फोर्स'नंतर अक्षय कुमारच्या 'केसरी चॅप्टर २' चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. समीक्षक आणि प्रेक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'केसरी चॅप्टर २' चित्रपटाने पहिल्या दिवशी ७.८४ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली. दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी अक्षय कुमारच्या चित्रपटाने अनुक्रमे १०.०८ कोटी, ११.७० कोटींचा गल्ला जमवला. पण, त्यानंतर चित्रपटाच्या कमाईत मोठी घट पाहायला मिळाली. चौथ्या दिवशी या चित्रपटाने ४.५० कोटींची कमाई केली होती. तर पाचव्या 'केसरी चॅप्टर २' चित्रपटाने फक्त ४ कोटींचा व्यवसाय केला. आतापर्यंत अक्षयच्या या चित्रपटाने ३८,१२ कोटींची कमाई केली आहे.

Entertainment Live News Today 23 April 2025

सध्या मनोरंजनाची पर्वणी सुरू आहे. बरेच नवे हिंदी, मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मराठी नाटकं रंगभूमी गाजवत आहेत. मनोरंजनविश्वातील दिवसभरातील सर्व अपडेट्स जाणून घ्या...