वीरेंद्र तळेगावकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नोटाबंदी आणि जीएसटीचा दुहेरी घाला जवळपास सर्वच क्षेत्राला आर्थिक  मंदीच्या कवेत घेऊन गेला. पाच वर्षांपूर्वीच्या या कथित आर्थिक सुधारणेचे तीव्र फटके जाणवले ते मात्र मावळत्या वर्षांत. व्यवसाय कुंठितावस्थेच्या फेऱ्यातून कोही प्रमाणात तावून सुलाखून गेले ते फक्त करंगळीच्या पेरावरील काही क्षेत्रं. त्यात माध्यम नाही मात्र मनोरंजन क्षेत्राचा उल्लेख नक्कीच करावा लागेल.

वर्षांअखेरच्या ‘खाना’वळीतील चित्रपट जिनसांची फारशी चर्चा झाली नाही, मात्र राजकीय-सामाजिक आशयावरील चित्रपटांमुळे हे वर्ष नक्कीच स्मरणात राहिल. बॉलीवूडने कधी नव्हे ते ४,००० कोटी रुपयांचा तिकीटबारीचा पल्ला याच वर्षांत गाठला. २०१८ च्या तुलनेत यंदा प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी थेट ३० टक्के महसुली वाढ नोंदविली आहे. हजार कोटी रुपयांची भर त्यात पडली आहे.

१०० रुपयांवरील तिकिटांवरील आधीचा २८ टक्के कर १८ टक्के करण्याचा निर्णय वर्षभरापूर्वी घेण्यात आला होता त्याचेच हे फलित होते. म्हणूनच जवळपास ३०० कोटी रुपयांचा गल्ला मिळविणारा यश राज फिल्म्सचा ‘वॉर’ अव्वल ठरला. २०० कोटी रुपयांच्या घरात ‘क बीर सिंग’, ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’, ‘हाऊ सफुल्ल ४’ या चित्रपटांनी स्थान मिळवलं. याच जोरावर देशातील एकू ण माध्यम क्षेत्र १३ टक्के दराने वाढलं. आणि म्हणूनच हे क्षेत्र येत्या पाच वर्षांत ३ लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याचा मनसुबा बाळगून आहे.

माध्यम, मनोरंजन क्षेत्रासाठी उल्लेखनीय ठरलेल्या मावळत्या वर्षांत विदा (डाटा)हे खऱ्या अर्थाने विकासाच्या दिशेने नेणारं इंजिन ठरलं. माध्यम, मनोरंजन क्षेत्रासाठी आशय पुरवणाऱ्या देशातील डाटा सेंटर उद्योगाचीही वाढ परिणामी वेगाने होत असून पाच वर्षांत हे क्षेत्र ३.२ अब्ज डॉलपर्यंत पोहोचणार आहे. यामध्ये अर्थातच बॉलीवूड आणि टॉलीवूडचा हिस्सा अधिक  आहे. स्मार्टफोन बघणारे आणि डाटावर जगणारे असे देशातील ५७.८० कोटी लोक  सध्या प्रति सेकंद १,५०० जीबी वेगाचे डाटा ग्राहक  आहेत.

प्रत्येक  भारतीय वर्षांला सरासरी १,८०० तास स्मार्टफोनवर व्यतीत क रतो. म्हणजेच दिवसाला पाच तास तो अद्ययावत मोबाइल खिडकीतून विश्व पाहतो. अशापैकी अध्र्याहून अधिक  लोक  तर त्यांचे समाजमाध्यमी मंचही सोडायला तयार नसतात. अगदी जवळच्या मित्र, नातेवाईकोंशी संभाषण क रायचं तर प्रत्यक्ष भेटणं, बोलण्यापेक्षा तो याच मंचाचा सर्वाधिक  वापर क रतो. अगदी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेतली तर केवळ शाळेतील मुलांमधील ७५ जणांक डे स्मार्टफोन आहेत. झोपेव्यतिरिक्तच्या एकूण वेळेपैकी माणसाचा एक तृतियांश वेळ हा स्मार्टफोनवर व्यतीत होतो.

याला कोरण डाटाच्या किमती क मी होणे. ज्याप्रमाणे महिन्याला ०३ जीबीवरून ७.६ जीबीपर्यंतचा माणशी डाटा वापर वाढला त्याचप्रमाणे डाटाच्या महिन्याचे दरही गेल्या पाच वर्षांत प्रति जीबी २६९ रुपयांवरून १२ रुपयांवर येऊन ठेपले. आज भारतातील ४० कोटी लोक  व्हॉट्सअप तर ३० कोटी लोक  फेसबुक वर पडलेले असतात. टिक टॉक , यूटय़ुब, ओटीटीवरच्या वापरकर्त्यांची संख्याही प्रत्येकी २० क ोटींपेक्षा अधिक आहे. सुरुवातीला फुकटची सवय लावून प्रसंगी सलग दोन वर्षे ताळेबंदात नुक सान नोंदविणाऱ्या रिलायन्स जिओनेही महागाईची कास धरली ती याच वर्षांत..

इंटरनेटच्या जाळ्यातील आपल्या प्रवासात २ जीवरून आपण ४ जीवर कधी आलो आणि त्यामुळे ३जी मध्ये होतं की नाही हे चिमटा घेऊनही आठवणार नाही, असं संक्रमण या विश्वाने पाहिलं. नेटक ऱ्यांपुढे नव्या वर्षांला ५जी वाढूनच ठेवलं आहे. सध्याच्या ४जीच्या तुलनेत १० पटींनी अधिक  वेग असणाऱ्या या इंटरनेट सुविधेमुळे मोबाइल डाटा वाहतूक कोंडी नजीक च्या कोही वर्षांमध्ये चारपटीने वाढणार आहे. वाढीव थकीत क र्जाचा भार वाहणाऱ्या दूरसंचार कं पन्यांना एकीक डे सरकोरदफ्तरी जमा करावे लागणाऱ्या रक मेची तजवीज क रावी लागते आहे. तर दुसरीक डे स्पर्धेपोटी छेडलेल्या किंमतदर युद्धामुळे महसुली उत्पन्नही क मी होते आहे. त्यांची ग्राहक संख्येतील अस्वस्थता तर महिन्यागणिक  वाढतेच आहे.

ओटीटीसारखे सध्या असलेल्या ४० व्यासपीठांची संख्याही येत्या कोलावधीत वाढेलच. या किंवा एकूणच दृक् श्राव्य माध्यम पाहणाऱ्या, ऐकणाऱ्यांपैकी ५ ते ७ टक्के इंग्रजी चाहते सोडले तर ६० टक्क्यांपर्यंत आणि ४३ टक्क्यांपर्यंत आपल्या मातृभाषेतील कंटेंट पाहणाऱ्यांची संख्या आहे. हॅशटॅगमुळे प्रसिद्ध झालेले व सामान्यांनाही आपलेसे वाटू लागणारे ट्विटर बातमीची विश्वासार्हता म्हणून उपयोगात आणले गेले ते हेच वर्ष. केबल अथवा डीटीएचसाठी पैसे भरणाऱ्यांचं प्रमाण आज ६५ टक्के आहे. मात्र त्यापेक्षाही अधिक  प्रमाण हे ओटीटीसारख्या मंचांवर नोंदणी क रणाऱ्यांचं आहे.

वर्षभरात १,८८० चित्रपटांची तिकि टे मिळवून देणाऱ्या ‘बुक  माय शो’च्या मंचावरही यंदा हिंदी चित्रपटासाठीची मागणी दुहेरी अंकोत वाढली. तर एकूण मागणी वार्षिक  तुलनेत थेट ८९ टक्क्यांनी वाढली. त्याचबरोबर विविध मनोरंजनात्मक  कोर्यक्रम, संगीत सभा, नाटके , क्रीडा आदींसाठीची तिकीट नोंदणी या वर्षांत २३ टक्क्यांनी वाढली. असे १७,५०० कोर्यक्रम या मंचावर उपलब्ध होते.

माध्यम व मनोरंजन क्षेत्रात प्रामुख्याने धुरळा उडाला तो माध्यम क्षेत्रात. डीएनए, डेक्कन क्रोनिकल, हिंदुस्थान टाइम्स, नेटवर्क १८ सारखी माध्यमे व्यवसाय आणि रोजगाराबाबत यंदा आक्रसली. एकूणच वाचन क मी होऊन पाहणे आणि ऐक णे वाढल्याने त्याचा विपरीत परिणाम- विशेषत: मुद्रित माध्यमांवर- अधिक  जाणवला. यातील अनेक  खेळाडूही अधिक ऑनलाइन अंगीकार करते झालेही. तरी केवळ लाइक  आणि शेअरवरील त्यांची मदार मर्यादित ठरली. परिणामी त्यांनाही अन्य माध्यममंचांप्रमाणे सबस्क्रिप्शनची निकड भासू लागली. आपल्या मंचावरील कंटेंट पाहून केवळ पुढे ढकलण्याबरोबरच त्याचे उत्पन्न व अप्रत्यक्षपणे नफ्यात रूपांतर क रण्याची ही निकडही याच, २०१९ मावळत्या वर्षांने दिली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Entertainment demonetization gst financial meltdown abn