रेश्मा राईकवार

काही चिवित्र वागणारी माणसं आणि त्यांच्याबरोबर घडणाऱ्या तशाच चिवित्र घटनांमधून उभ्या राहणाऱ्या विनोदाची एक साखळी असलेली कथा रंगवत नेणं ही दिग्दर्शक म्हणून रोहित शेट्टीची खासियत आहे. त्याची यशस्वी ठरलेली ‘गोलमाल’ ही चित्रपट मालिका त्याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. खरंतर, अॅक्शन हिरो म्हणून ज्या रणवीरचा त्याने ‘सिम्बा’साठी हात धरला, तो विनोदी भूमिका उत्तम करू शकतो हे लक्षात आल्यानंतर एक नव्हे रणवीरची दुहेरी भूमिका घेऊन त्याने ‘सर्कस’ नावाच्या विनोदी चित्रपटाचा घाट घातला खरा.. मात्र ठरावीक प्रसंगानुरूप विनोद सोडला तर एकूणच शेट्टीच्या या विनोदी ‘सर्कस’मध्ये मनोरंजनाचा शुकशुकाटच आहे.

Emotional message for father
“डोळ्यातले अश्रु डोळ्यांतच जिरवण्याची ताकद फक्त ‘बापाकडे’ असते” तरुणाची पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Jui Gadkari
Video : शूटिंगमध्ये फावला वेळ मिळताच जुई गडकरी काय करते? स्वत: व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
Musical dance drama Urmilayan Aryans Group of Companies Kamesh Modi
सांगीतिक नृत्यनाट्य ‘ऊर्मिलायन’
Young Girl Performs Lavani Dance
गौतमी पाटील तरुणीसमोर फेल! सादर केली सुरेख लावणी, VIDEO होतोय व्हायरल
Navri Mile Hitlarla
पाडवा साजरा करण्यासाठी लीलाने केली युक्ती; टायगरला बोलवताच एजेने…; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
Suraj Chavan
गळ्यात हार घातला, पाया पडला, डोक्यावरून हात फिरवत सूरज चव्हाणने रूद्राप्रति ‘अशी’ केली कृतज्ञता व्यक्त; पाहा व्हिडीओ

‘कॉमेडी ऑफ एर्स’ हा शेक्सपिअरच्या नाटकातून प्रसिध्द झालेला कथाप्रकार. या कथाप्रकाराने हिंदूी चित्रपट दिग्दर्शकांना याआधीही भुरळ घातली आहे. त्यातला सगळय़ात यशस्वी ठरलेला अलीकडचा चित्रपट म्हणून संजीव कुमार आणि देवेन वर्मा यांची मुख्य भूमिका असलेल्या १९८२ सालच्या ‘अंगूर’ चित्रपटाचा उल्लेख केला जातो. प्रसिध्द गीतकार गुलजार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते हे त्याचे खास वैशिष्टय़. जुळय़ा भावांच्या दोन जोडय़ा, वेगवेगळय़ा परिस्थितीत आणि प्रांतात वाढलेल्या.. आपल्यासारखाच हुबेहूब दिसणारा कोणीतरी आहे याची किंचितशीही कल्पना नसलेली ही चार माणसं जेव्हा एका वेळी एका ठिकाणी अडकतात तेव्हा त्यातून काय काय प्रासंगिक विनोद घडू शकतात याचे चित्रण म्हणजे ‘अंगूर’. रोहित शेट्टीने हीच कथाकल्पना उचलून घेत त्याला उगीचच तार्किक चौकटीत बसवण्याची औपचारिकता कथेत पूर्ण केली आहे. म्हणजे गुलजार यांनी तिथे मालक आणि नोकर अशी व्यवस्था केली होती. इथे हे भाऊ-भाऊ म्हणूनच एकत्र लहानाचे मोठे झाले आहेत. आणि त्यातल्या त्यात या विनोदी गोंधळाला काही एक अर्थ आहे असं किमान वाटावं म्हणून त्याला मूल आपल्या रक्ताचंच हवं हा हट्ट किती चुकीचा आहे, त्यामागच्या अपेक्षा किती फोल आहेत या विषयाची जोड कथेला देण्याचा प्रयत्न त्याने केला आहे.

गेल्या दोन वर्षांत रोहित शेट्टीने आपल्या चित्रपट मालिकांचं एक स्वतंत्र विश्व उभारायला सुरूवात केली आहे. यात त्याने पोलिसांवर बनवलेले चित्रपट आणि आगामी वेबमालिका एकत्र केली आहे. आता असाच काहीसा प्रकार ‘गोलमाल’ या त्याच्या यशस्वी ठरलेल्या विनोदी चित्रपट श्रुंखलेला जोडून घेण्याच्या दृष्टीने केला जातो आहे. ‘सर्कस’शी याचा संबंध काय? याचं उत्तर तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरच मिळेल. मात्र हे असं सगळंच नवं नवं करण्याच्या नादात आणि वर म्हटल्याप्रमाणे ‘अंगूर’सारखं एक धम्माल कथानक घेऊन खास रोहित शेट्टी इस्टाईल मनोरंजन देण्याच्या नादात चित्रपट फसला आहे. उलट अर्थाने खरोखरच या सगळय़ा जोडकामांची सर्कस होऊन बसली आहे, याचं वाईट वाटतं. आपल्याला मूल होत नाही वा होऊ शकत नाही म्हणून खंतावणारे अनेक तरुण पालक आपल्या समाजात आहेत. आणि दुसरीकडे आई-बाप नाहीत म्हणून अनाथाश्रमात दाखल होणाऱ्या मुलांची संख्याही तितकीच मोठी आहे. हा दुवा खरंतर सांधायला हवा. दोन्हीकडच्या बाजू जुळल्या तर अगदी सुखांतिका नाही, पण कित्येक भविष्यं घडतील हे वास्तव आहे. पण.. मूल आपलं स्वत:चं, आपल्या रक्ताचंच हवं.. हा हट्ट समाजमनात खोल रुतून बसला आहे. आयव्हीएफ, सरोगसी तंत्रज्ञानाने सुचवलेले हे मार्ग अवलंबून का होईना आई-बाप होण्याची इच्छा पूर्ण केली जाते. पण दत्तक घेण्याचा विचार तितक्या सहजी केला जात नाही. खरंतर या विषयावर तितकाच संवेदनशील, निखळ चित्रपट होऊ शकला असता. मात्र या विषयाला विनोदाच्या दावणीला बांधून त्याची सर्कस केली गेली आहे. त्याऐवजी निव्वळ कथा म्हणूनही ‘कॉमेडी ऑफ एर्स’चं शेट्टी स्टाईल रूपांतरण लोकांनी स्वीकारलं असतं.

मूळ कथाप्रकार रंगवण्यासाठी चुकीच्या पध्दतीने केलेली कथेची निवड, जुळय़ा भावंडांच्या दोन जोडय़ा आजच्या मोबाइल युगात शोधणं सहजशक्य आहे ही शंका पाहणाऱ्याने विचारू नये म्हणून कथा मोबाइलपूर्व काळात हलवली गेली आणि साराच प्रकार फसला. तिथे किमान गुलजारांनी वास्तव चित्रण केले होते. इथे सगळाच चित्रपट या भडक रंगाच्या सेटवरून त्या भडक रंगाच्या सेटवर आपल्याला फिरवत राहतो आहे असंच वाटत राहतं. नाही तिथे कथेला तर्काच्या खुंटीला बांधण्याचा हा प्रकार रोहित शेट्टीच्या या भव्य चित्रपटाला चांगलाच नडला आहे. रणवीर सिंग आणि वरुण शर्मा हे दोघेही सहज विनोदी अभिनयासाठी ओळखले जातात. ‘सिम्बा’मधला संग्राम भालेराव याच विनोदाच्या जोरावर भाव खाऊन गेला होता. इथे मात्र रणवीरला एकाही भूमिकेत आपल्यातला विनोदी हुनर बाहेर काढता आलेला नाही, किंबहुना दुहेरी भूमिकेला मीटरमध्ये बसवण्यातच त्याचा अभियन खर्ची पडला आहे. वरुणला तर त्याच्या पाव टक्काही विनोद वाटय़ालाच आलेला नाही. या सगळय़ा सर्कसमध्ये भाव खाऊन गेला आहे तो म्हणजे आपला सिध्दू. अभिनेता सिध्दार्थ जाधवने त्याच्या वाटय़ाला आलेले काही थोडके प्रसंगही उत्तम रंगवले आहेत. संपूर्ण दोन तास वीस मिनिटांच्या चित्रपटात सिध्दार्थच्या बरोबरीने चित्रित झालेले विनोदी प्रसंग आणि संजय मिश्रांचे काही एक-दोन प्रसंग लक्षात राहतात. बाकी झाडून सगळी नामांकित विनोदातली दादा मंडळी म्हणजे जॉनी लिव्हर, टिकू तलसानिया, व्रजेश हिरजी, अश्विनी काळसेकर, मुकेश तिवारी, ब्रजेंद्र कार्ला, मुरली शर्मा कोणालाच यात चांगली भूमिका वाटय़ाला आलेली नाही. चित्रपटात गाणीही तीनच.. त्यातल्या त्यात ‘सुन जरा’ हे गाणं थोडंफार ऐकायला बरं वाटतं. बाकी सगळाच आनंदी आनंद आहे. रणवीरची सर्कसच्या करामतींखातर तरी काही अॅक्शन पाहायला मिळेल तर तेही नाही. विनोदासाठी केलेल्या चित्रपटात विनोदच नसावा यासारखी शोकांतिका ती दुसरी कुठली?
सर्कस
दिग्दर्शक – रोहित शेट्टी, कलाकार – रणवीर सिंग, वरुण शर्मा, जॅकलीन फर्नाडिस, पूजा हेगडे, सिध्दार्थ जाधव, जॉनी लिव्हर, टिकू तलसानिया, व्रजेश हिरजी, अश्विनी काळसेकर, मुकेश तिवारी, ब्रजेंद्र कार्ला, मुरली शर्मा.

‘अटल’ चित्रपटातील पंकज त्रिपाठी यांची पहिली झलक प्रदर्शित
भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांच्या जीवनावर आधारित चरित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मैं रहूं या न रहूं ये देश रहना चाहिए’ या उद्घोषासह येणाऱ्या ‘अटल’ या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी अटलबिहारी वाजपेयींची भूमिका साकारणार आहेत. वाजपेयींच्या भूमिकेतील त्यांची पहिली झलक समोर आली आहे.
पंकज त्रिपाठी एक अभ्यासू अभिनेते असून त्यांच्या सकस अभिनयाने ते नेहमीच प्रेक्षकांना भुरळ घालत असतात. आजवर प्रामुख्याने विनोदी आणि इतर चरित्र भूमिकांमधून पंकज त्रिपाठी यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. मात्र अटलजींच्या भूमिकेत ते कसे दिसतील? याबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
‘मैं रहूं या न रहूं ये देश रहना चाहिए – अटल’ या चित्रपटात अटलबिहारी वाजपेयी यांचा वैयक्तिक आणि राजकीय प्रवास उलगडणार आहे. वाजपेयी एक कवी, राजकारणी, नेता आणि मानवतावादी होते. त्यांच्यातील अनेक पैलूंचा उलगडा त्यांच्या चरित्रपटातून केला जाणार आहे. ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांचे दिग्दर्शन केलेले रवी जाधव या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. भानुशाली स्टुडिओ लिमिटेड आणि लेजेंड स्टुडिओ यांची प्रस्तुती असलेला ‘अटल’ या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा विनोद भानुशाली, संदीप सिंह, सॅम खान आणि कमलेश भानुशाली यांनी सांभाळली असून जिशान अहमद आणि शिव शर्मा हे सहनिर्माता आहेत. हिंदूी आणि इंग्रजी भाषेत हा चित्रपट २०२३ मध्ये देशभरात प्रदर्शित होणार आहे.

एका जंगलाची’चा शुभारंभाचा प्रयोग
नाताळ, दिवाळी किंवा गणपतीच्या सुट्टीत लहान मुले मैदानी खेळ खेळण्याचे विसरून मोबाइलवरील गेम खेळण्यात किंवा इतर करमणुकीचे व्हिडीओ पाहण्यात मग्न झालेले दिसून येतात. या पिढीला मोबाइलच्या विश्वातून बाहेर आणण्यासाठी ‘लाईट अॅण्ड शेड’ प्रकाशित आणि ‘ग्रीन सिग्नल एन्टरटेन्मेंट’ निर्मित ‘ एका जंगलाची’ हे बालनाटय़ खास आपल्या बालमित्रांच्या भेटीला घेऊन आले आहेत. नाटकाचे दिग्दर्शन नीरज शिरवईकर यांनी केले असून ग्रीन सिग्नल एन्टरटेन्मेंटच्या अनघा विजू माने यांनी या बालनाटय़ाची निर्मिती केली आहे. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रविवारी, २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता श्री शिवाजी मंदिर, दादर येथे होणार आहे. मराठी नाटकांमध्ये सकस गोष्टींना, निराळय़ा आशयांना आणि संहितांना कायमच रसिकाश्रय मिळत आला आहे. त्यामुळे आजच्या लहान पिढीने त्यांच्या हातांचा सदुपयोग मोबाइल चालवण्याऐवजी वृक्षारोपण करण्यासाठी करावा, असा संदेश देण्याचा प्रयत्न या बालनाटय़ातून करण्यात आला आहे. काही लहान मुलांचा समूह जंगलात वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला जातात. त्या ठिकाणी त्यांना येणाऱ्या अडथळय़ांवर मात करत ते कशाप्रकारे स्वत:चे आणि आपल्या मित्र-मैत्रिणींचे संरक्षण करतात हे पल्लवी वाघ यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘घोस्ट एका जंगलाची’ या बालनाटय़ात पाहायला मिळणार आहे. थिएटर कोलाजच्या २७ बालकलाकारांबरोबर योगेश खांडेकर, शिल्पा साने या कलाकारांनीही या नाटकात अभिनय केला आहे.

नाताळनिमित्त अर्जुन आणि रेवथीचा खास पेहेराव
मराठी भाषक आणि कानडी भाषक यांच्यातल्या प्रेमाची कहाणी रंगवणारी ‘जिवाची होतिया काहिली’ ही सोनी मराठी वाहिनीवरील मालिका सध्या लोकप्रिय आहे. मालिका आता वेगळय़ा वळणावर पोहोचली आहे. अर्जुन आणि रेवथी यांच्यात मैत्री झाली असून या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होताना पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. हा मैत्री विशेष भाग नाताळच्या निमित्ताने पाहता येणार आहे.
सध्या मालिकेत अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त रेवथीची धावपळ सुरू आहे. तिला अर्जुनसाठी विशेष असाकाही बेत अखायचा आहे. नुकतीच त्यांनी मॉलमध्ये जाऊन खरेदी केली आहे. दोघांचे वेगळे बाह्यरूप पाहायला मिळते आहे. पण या गोंधळात नेमके अप्पा पाहतील म्हणून सॅन्टाक्लॉजचे कपडे घालून ते आप्पांसमोर जातात. हे पाहणं फार मजेशीर ठरणार आहे. ही सगळी गंमत नाताळच्या निमित्ताने २५ डिसेंबर रोजी होणाऱ्या विशेष भागात रात्री ८ वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.