Trending Entertainment News Updates : चित्रपटाच्या शूटींगदरम्यान दीपिका पदुकोणच्या प्रकृतीत बिघाड झाला. तिच्या छातीत धडधड वाढल्याने तिला रुग्णालात दाखल करण्यात आले आहे. तर दुसरीकडे नुकताच आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्या ब्रम्हास्त्रचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. याशिवाय बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर मोठ्या अडचणीत सापडला होता. त्याच्यावर ड्रग्ज घेतल्याचा आरोप असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. पण काल सिद्धांतला जामीन मिळाला आहे.
Entertainment News Live Updates : मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.
अभिनेत्री प्राजक्ता माळी मराठी मालिकांमुळे नावारुपाला आली. आपल्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका उत्तमरित्या साकारण्यासाठी ती प्रचंड मेहनत घेते. बहुचर्चित ‘रानबाजार’ वेबसीरिजसाठी देखील तिने खूप मेहनत घेतली. या सीरिजमधल्या भूमिकेसाठी तिने वजन वाढवलं. शिवाय धूम्रपानच्या विरोधात असताना तिला भूमिकेची गरज म्हणून हाती सिगारेट घ्यावी लागली.
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हे मराठी चित्रपटसृष्टीमधील बहुचर्चित कपल आहे. सध्या मिताली-सिद्धार्थ लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. त्यांचे लंडन ट्रिपदरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक ए आर रहमान यांची मुलगी खतीजा आणि रियासदीनशी यांचा विवाहसोहळा काही दिवसांपूर्वीच संपन्न झाला. खतीजा-रियासदीनचा रिसेप्शन सोहळा चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आला होता. या ग्रँड रिसेप्शनसाठी त्यांनी अवाढव्य खर्च केला. याच रिसेप्शन सोहळ्याच्या फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.
वरुण धवन आणि कियारा अडवाणी सध्या त्यांच्या आगामी ‘जुग जुग जियो’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनचाच एक भाग म्हणून वरुण-कियाराने चक्क मुंबई मेट्रोमधून प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी वडापाव खाल्ला. यामुळेच हे दोघंही आता ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत.
हॉलिवूड अभिनेत्री अँबर हर्ड आणि तिचा पूर्वश्रमीचा पती जॉनी डेप यांचा मानहानिचा खटला सोशल मीडियावर चांगलाच गाजला. बरेच खासगी आरोप प्रत्यारो आणि पोलखोल यामुळे हा खटला जगभरात चर्चेचा विषय ठरला होता. अर्थात या खटल्यात अँबर हर्डचा हार झाली आणि जॉनी डेपनं हा खटला जिंकला. त्यानंतर अँबरला सोशल मीडियावर बरंच ट्रोल करण्यात आलं. ज्यावर नुकतंच एका मुलाखतीत अँबरनं प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूरला काही दिवसांपूर्वीच एका पार्टीमध्ये ड्रग्स घेतल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या या पार्टीत पोलिसांनी धाड टाकल्यानंतर सिद्धांतला अटक झाली होती. सिद्धांत व्यतिरिक्त या पार्टीमधू ड्रग्स घेतल्याच्या आरोपाखाली आणखी ५ जणांना अटत करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या पोलीस चौकशीमध्ये सिद्धांत कपूरनं स्वतःची बाजू मांडताना आर्यन खानचा मित्र अरबाज मर्चंटसारखीच उत्तरं दिली आहेत. या पार्टीमध्ये ड्रग्स असल्याची माहिती आपल्याला नव्हती असं सिद्धांतनं म्हटलं आहे.
प्रताप फड दिग्दर्शित ‘अनन्या’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. महिला दिनाच्या निमित्ताने या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून येत्या २२ जुलै रोजी ‘अनन्या’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याव्यतिरिक्त या चित्रपटाचे टीझरही झळकले आहेत. सायकलवर स्वार होत, आभाळात उत्तुंग भरारी घेणारी, आभाळाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करणारी एक आगळीवेगळी ‘अनन्या’ दिसत आहे. यात हृता दुर्गुळे ‘अनन्या’ची व्यक्तिरेखा साकारत आहे.
छोट्या पडद्यावरील ‘देवमाणूस’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ‘देवमाणूस’ या मालिकेचा २ भाग आपल्याला पाहायला मिळत आहे. या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. या मालिकेत प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचणारा डॉक्टर अजितकुमार देव म्हणजेच अभिनेता किरण गायकवाडचे लाखो चाहते असून त्याची प्रत्येक अपडेट प्रेक्षकांना जाणून घ्यायची असते. पण या सगळ्यात किरणने सोशल मीडियाला रामराम करण्याता निर्णय घेतला आहे.
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या सौंदर्यासाठी ओळखल्या जातात, त्यापैकी एक म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन. ती कोणत्याही शस्त्रक्रिया आणि मेकअपशिवाय सुंदर दिसते. ऐश्वर्या ही जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक आहे. ऐश्वर्या फक्त रील लाईफ नाही तर रियल लाईफमध्येही तितकीच सुंदर दिसते हे तिच्या पासपोर्टवरून कळते. ऐश्वर्याचा पासपोर्ट सोशल मीडियावर समोर आला आहे. तिच्या पासपोर्टचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
नुकतंच भरत जाधव यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त भरत जाधव यांनी ही खास पोस्ट केली आहे. राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त भरत जाधव यांनी जुना व्हिडीओ पुन्हा शेअर केला आहे. त्याला त्यांनी फार हटके कॅप्शन दिले आहे.
दीपिका पदुकोण ही सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. याच चित्रपटाच्या शूटींगदरम्यान तिच्या तब्येतीत अचानक बिघाड झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे तिला हैदराबादमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वरुण धवन आणि कियारा आडवाणी यांचा ‘जुग जुग जियो’ हा चित्रपट सध्या बराच चर्चेत आहे. नुकतंच जुग जुग जियो या चित्रपटाची तगडी स्टारकास्ट असलेली टीम ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर पोहोचली आहे. याचा एक व्हिडीओ अभिनेता वरुण धवनने शेअर केला आहे.
मराठीमध्ये आता दर्जेदार चित्रपटांची निर्मिती होत आहे. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’. अजूनही या चित्रपटाची क्रेझ काही कमी झालेली नाही. कलाकार मंडळींनीही हा चित्रपट पाहिला. अभिनेत्री अमृता खानविलकरला देखील हा चित्रपट पाहिल्यानंतर राहावलं नाही आणि तिने एक पोस्ट शेअर करत प्रसादचं तोंडभरुन कौतुक केलं.
अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांची मुख्य भूमिका असलेला ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाचा ट्रेलर अखेरीस प्रदर्शित झाला आहे. अवघ्या दोन तासांमध्ये हजारो लोकांनी हा ट्रेलर पाहिला. ट्रेलर पाहिल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे.
छोट्या पडद्यावरील ‘पंड्या स्टोअर’ या मालिकेत ऋषिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री सिमरन बुधरूपने नुकताच असा धक्कादायक खुलासा केला आहे. सोशल मीडियावर तरुण पिढीकडून आपल्याला सातत्याने बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे तिने सांगितल आहे.
बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते सुधीर मिश्रा यांच्या आईचे काल निधन झाले. सुधीर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांपासून सेलिब्रिटीजपर्यंत अनेक सांत्वन करत आहेत. या यादीत बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांचाही समावेश आहे. अनिल कपूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांत्वन करण्याचा प्रयत्न केला आहे. पण यासगळ्यात अनिल ट्रोलिंगचा शिकार झाले आहेत.
अभिनेत्री निवेदिता सराफ या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. निवेदिता या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकतीच निवेदिता यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी एका आईला कोणती गोष्ट करताना वाईट वाटतं या विषयी सांगितले आहे.
अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची सोशल मीडियावर बरीच चर्चा होती. अगदी चित्रपटाच्या घोषणेपासून ते लूक आणि पोस्टर लॉन्चपर्यंत सर्वच गोष्टी चर्चेत राहिल्या होत्या. मागच्या बऱ्याच काळापासून सर्वांना या चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार याची प्रतीक्षा होती. पण ही प्रतीक्षा आता संपली असून नुकताच ‘ब्रह्मास्त्र’चा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सोशल मीडियावर सध्या याच ट्रेलरची सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे.
झी मराठीवर ‘किचन कल्लाकार’ हा कुकरी शो प्रेक्षकांच्या भेटीस आला. या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या कुकरी शोचे अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये मुख्यमंत्रीच नाही तर तर स्वतःला भावी पंतप्रधान आणि राष्ट्रपती पदाचे दावेदार समजणारे अभिजीत बिचुकलेने यावेळी हजेरी लावली होती. यावेळी बिचुकलेने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विषयी एक विधान केले आहे.
कलाकार हे त्यांची भूमिका निभावण्यासाठी आणि त्यात एक जीव ओतण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करतात आणि सगळ्यात कधी त्यांना दुखापत देखील होती. अशीच परिस्थिती ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत लतिकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अक्षया नाईकवर आली आहे. सेटवर अपघात झाल्याने लतिकाच्या पायाला दुखापच झाली आहे. अक्षयाने याविषयी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत सांगितले आहे.
मनोरंजन क्षेत्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर