Entertainment News Today, 19 April 2025: सध्या बॉक्स ऑफिसवर सनी देओलचा ‘जाट’ व अक्षय कुमारचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘केसरी चॅप्टर २’ची चर्चा सुरू आहे. दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मराठी सिनेसृष्टीत ‘अशी ही जमवा जमवी’, ‘जयभीम पँथर’, ‘पावटॉलॉजी’, ‘सुशीला सुजीत’ आणि ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हे नवे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. तर मराठी मालिकाविश्वात ‘लग्नानंतर होईलच प्रेम’, ‘ठरलं तर मग’, ‘पारू’ अशा लोकप्रिय मालिकेत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आजच्या दिवसभरातील सिनेसृष्टी आणि मालिकाविश्वातील सर्व अपडेट्स जाणून घ्या…
Entertainment News Update Today, 19 April 2025
Entertainment News Updates: मनोरंजनविश्वातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या...
सई ताम्हणकरबरोबरचं गाणं पाहून समीर चौघुलेंच्या वडिलांची होती 'ही' भन्नाट प्रतिक्रिया, म्हणाले…
शशांक केतकरच्या ४ वर्षांच्या लेकाची कमाल! आईला मदत केली अन् बाबासाठी बनवलं खास थालीपीठ, पाहा व्हिडीओ
चार तासांच्या चौकशीनंतर प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याला अटक
केरळचा प्रसिद्ध मल्याळम अभिनेता शाइन टॉम चाकोला अटक केल्याचं वृत्त समोर आलं आहे. शाइन ड्रग्जचं सेवन करत आरोप करण्यात आला आहे. केरळच्या एर्नाकुमल टाउनचे नॉर्थ पोलीस स्टेशनमध्ये चार तासांच्या चौकशीनंतर अभिनेताला अटक करण्यात आली आहे. याआधी, २०१५मध्ये शाइन टॉम चाकोला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. यावर्षीच्या सुरुवातीला त्याची सुटका करण्यात झाली होती. पण, बुधवारी १६ एप्रिलला रात्री उशीरा कोचीच्या एका हॉटेलमध्ये पोलिसांनी छापेमारी केली. यावेळी शाइन तिथून पळ काढताना दिस. त्यामुळे पोलीस शाइनच्या शोधात होती. पोलिसांनी आज सकाळी १० वाजता त्याला समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. जवळपास चार तासांच्या चौकशीनंतर शाइनवर कारवाई केली गेली.
स्वप्नील जोशी गेली दहा वर्ष स्वत:चं नाव न लावता करतोय चित्रपट निर्मिती, नेमकं कारण काय?
'आज्जीबाई जोरात' नाटकाला सध्या रंगभूमीवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. उद्या या नाटकाचा शतक महोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्ताने क्षितिज पटवर्धनने नुकतीच पोस्ट शेअर केली आहे. नाटकातील कलाकारांबरोबर फोटो पोस्ट करत लिहिलं, "टीम म्हणून सुरुवात झाली, आता कुटुंब म्हणून वाटचाल सुरू आहे. आज्जीबाई जोरात, उद्या शतक महोत्सव साजरा करतंय. तुमचं प्रेम, पाठिंबा असंच जोरात राहू द्या. मराठीसाठी फक्त ओरड न करता तिच्या वाढीसाठी सकारात्मक प्रयत्न म्हणून नाटक केलं ह्याची नोंद आजचे आणि उद्याचे रसिक ठेवतील ही खात्री वाटते."
https://www.instagram.com/p/DIn1nhxIdT0/?utm_source=ig_web_copy_link
Video: लेकीच्या साखरपुड्यात अरविंद केजरीवाल यांचा पत्नीसह 'पुष्पा २' चित्रपटातील 'अंगारो' गाण्यावर जबरदस्त डान्स, व्हिडीओ झाला व्हायरल
'जब मी मेट'मध्ये शाहिद कपूरऐवजी बॉबी देओल दिसणार होता पण…; अभिनेत्याने सांगितलं, "अचानक काढून टाकलं अन्…"
'कोण होतीस तू, काय झालीस तू!' मालिकेचा पाहा नवा प्रोमो
गिरीजा प्रभूची मुख्य भूमिका असलेली 'कोण होतीस तू, काय झालीस तू!' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. २८ एप्रिलपासून दररोज रात्री ८ वाजता ही मालिका 'स्टार प्रवाह' वाहिनीवर प्रसारित होणार आहे. या मालिकेत गिरीजा प्रभू व्यतिरिक्त अभिनेता मंदार जाधव, सुकन्या मोने, साक्षी गांधी, वैभव मांगले अशी तगडी कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत. या मालिकेचा नुकताच नवा प्रोमो समोर आला आहे.
https://www.instagram.com/reel/DInU9caSTzG/?utm_source=ig_web_copy_link
L2 Empuraan OTT Release : मोहनलाल यांचा ‘एल-२ एम्पुरान’ ओटीटीवर होणार दाखल, कधी व कुठे पाहता येणार? जाणून घ्या…
"डोळ्यात पाणी आणून आपल्याला जागं करणारं…", हेमंत ढोमेने 'भूमिका' नाटकाचं केलं कौतुक, म्हणाला, "भारतीय रंगभूमीवरचा मैलाचा दगड…"
Video : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेच्या घरी आली नवी पाहुणी! खरेदी केली आलिशान गाडी, किंमत किती?
श्वेता शिंदेची नवी मालिका कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या...
लोकप्रिय अभिनेत्री, निर्माती श्वेती शिंदेची नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'हुकुमाची राणी ही' असं मालिकेचं नाव असून २१ एप्रिलला पासून ही नवी मालिका प्रसारित होणार आहे. सोमवार ते रविवार सायंकाळी ७ वाजता ही मालिका पाहायला मिळणार आहे.
'स्टार प्रवाह'वर २६ एप्रिलपासून नवीन शो 'शिट्टी वाजली रे' प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. दर शनिवार-रविवार रात्री ९ वाजता हा नवा शो पाहता येणार आहे. या शोमध्ये लोकप्रिय कलाकार मंडळी स्वयंपाक करत प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करणार आहे. अशातच 'शिट्टी वाजली रे'ला टक्कर देण्यासाठी 'सोनी मराठी'ने नव्या कुकिंग शोची घोषणा केली आहे. ‘आज काय बनवू या?- मधुरा स्पेशल’, असं 'सोनी मराठी'च्या नव्या शोचं नाव आहे.
‘आज काय बनवू या?- मधुरा स्पेशल’ हा शो लोकप्रिय मधुरा बाचल होस्ट करणार आहे. ५ मेपासून हा नवा शो सुरू होणार आहे. सोमवार ते शुक्रवार दुपारी १ वाजता ‘आज काय बनवू या?- मधुरा स्पेशल’ हा शो पाहायला मिळणार आहे.
https://www.instagram.com/reel/DIl9AJFMzxe/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA%3D%3D
Video : 'आलेच मी…', सईच्या गाण्यावर अमृता खानविलकरचा जबरदस्त डान्स! एनर्जी पाहून नेटकरी थक्क, कमेंट्सचा पाऊस
"बद्रीनाथ धाममध्ये माझं मंदिर…", उर्वशी रौतेलाच्या वक्तव्यामुळे नवा वादंग; पंडितांनी व्यक्त केली संतप्त भावना, म्हणाले, "हा सर्व मूर्खपणा…"
सलमान खानच्या 'सिकंदर'नंतर सध्या सनी देओलच्या 'जाट' चित्रपट ( Jaat Movie Collection ) बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. पण, अशातच अक्षय कुमारचा 'केसरी चॅप्टर २' ( Kesari Chapter 2 ) चित्रपट १८, एप्रिलला प्रदर्शित झाला आहे. अक्षय कुमारच्या चित्रपटामुळे 'जाट'ला बॉक्स ऑफिसवर अडचणी येतील अशी शक्यता होती. मात्र असं काही झालं नाही. 'केसरी चॅप्टर २'च्या प्रदर्शनानंतरही सनी देओलच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 'जाट' चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईच्या तुलनेत 'केसरी चॅप्टर २'ने कमी कमाई केली आहे. सनी देओलच्या चित्रपटाने प्रदर्शनानंतर पहिल्या दिवशी ९.५ कोटींची कमाई केली होती. सॅकनिल्कच्या रिपोर्टनंतर, 'केसरी चॅप्टर २'ने पहिल्या दिवशी ७.५ कोटींची कमाई केली आहे. तसंच 'जाट'ने आतापर्यंत ६५.९० कोटींची कमाई केली आहे.
सध्या मनोरंजनाची पर्वणी सुरू आहे. बरेच नवे हिंदी, मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मराठी नाटकं रंगभूमी गाजवत आहे. मनोरंजनविश्वातील दिवसभरातील सर्व अपडेट्स जाणून घ्या...