Entertainment News Today, 13 April 2025: सध्या बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य चित्रपट ‘गुड बॅड अग्ली’ धुमाकूळ घालताना दिसत आहे. हिंदी, तमिळ, तेलुगु या तीन भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात अजित कुमार मुख्य भूमिकेत झळकला आहे. तसंच दुसऱ्या बाजूला सनी देओलच्या ‘जाट’ चित्रपटाच्या कमाईत हळूहळू वाढ होताना पाहायला मिळत आहे. मराठी सिनेसृष्टीत ‘अशी ही जमवा जमवी’, ‘जयभीम पँथर’, ‘पावटॉलॉजी’ हे नवे चित्रपट नुकतेच प्रदर्शित झाले आहेत. तर मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट येत आहेत. आजच्या दिवसभरातील सिनेसृष्टी आणि मालिकाविश्वातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या….
Entertainment News Today : मनोरंजन न्यूज अपडेट
“तुला हे शोभत नाही”, मधुराणी प्रभुलकरचं हॉट फोटोशूट पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया; म्हणाले, “चुकीच्या प्रवाहात…”
मधुर भांडारकरांचा ‘चांदणी बार’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर महेश भट्ट यांनी केलेली शिवीगाळ; म्हणाले,”कार्पेटवर झोपलो होतो…”
“मी तुझे कुटुंबात…”, जया बच्चन यांचे ‘ते’ शब्द ऐकून ऐश्वर्या रायला झालेले अश्रू अनावर
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेता लवकरच नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार, सोबतीला असणार अलका कुबल, म्हणाला…
“नट म्हणून जितका श्रेष्ठ तितकाच माणूस म्हणून…”; अशोक सराफ यांच्याविषयी वंदना गुप्ते काय म्हणाल्या?
“चित्रपट पाहिल्यानंतर मत मांडा”, ‘फुले’ चित्रपटाच्या वादावर अभिनेता प्रतीक गांधीचे वक्तव्य, म्हणाला…
हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ हा चित्रपट चांगलाच गाजला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने बक्कळ कमाई केली. त्यानंतर हेमंतचा ‘झिम्मा २’ चित्रपट २४ नोव्हेंबर २०२३ ला प्रदर्शित झाला. यादेखील चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ‘झिम्मा २’ चित्रपटात सुहास जोशी, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, निर्मिती सावंत, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू आणि सिद्धार्थ चांदेकर असे तगडे कलाकार मंडळी झळकले. याचं सुपरहिट ‘झिम्मा २’ चित्रपटाचा लवकरच वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर ‘स्टार प्रवाह’वर होणार आहे. रविवारी १८ मेला संध्याकाळी ७ वाजता ‘झिम्मा २’ पाहायला मिळणार आहे.
सोनू कक्करने नेहा व टोनीशी तोडले संबंध, म्हणाली, “दोन टॅलेंटेड सुपरस्टार….”
“‘जब वी मेट’चा पार्ट २ आला तर गीतसाठी तू करेक्ट आहेस…”, रुपाली भोसलेचं ‘या’ अभिनेत्रीविषयी भाष्य, म्हणाली…
गौहर खानचा रॅम्पवॉक व्हिडीओ झाला व्हायरल
काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस’च्या सातव्या पर्वाची विजेती अभिनेत्री गौहर खानने आनंदाची बातमी दिली. वयाच्या ४१व्या वर्षी गौहर पुन्हा एकदा आई होणार आहे. एक सुंदर व्हिडीओ शेअर अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी दिली होती. त्यानंतर आता गौहरच्या रॅम्पवॉकच्या व्हिडीओने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘फिल्मीग्यान’ या इन्स्टाग्राम पेजवर गौहरच्या रॅम्पवॉकचा व्हिडीओ शेअर केला आहे.
Video: तेजश्री प्रधानने हिमाचल प्रदेशच्या ट्रीपचा पहिला Reel व्हिडीओ केला शेअर, म्हणाली, “एक जिंदगी मेरी…”
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाणच्या घराच्या बांधकामाची पाहणी, म्हणाले, “कुठेही कसूर राहता कामा नये”
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील नंदिनीने जीवाचे केले कौतुक; म्हणाली, “एक सहकलाकार…”
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामुळे प्रसिद्धी झोतात आलेला घनःश्याम दरवडे उर्फ छोटा पुढारी नेहमी चर्चेत असतो. नुकताच त्याने गावच्या यात्रेचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो मंदिराच्या पायऱ्या चढत नारळ फोडताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत घनःश्यामने लिहिलं, “कितीही कामात व्यग्र असलो तरी गावची यात्रा कुटुंबियांसमवेत साजरी करणं…आद्य कर्तव्य ..”
“मी सैफ अली खानचे चित्रपट पाहिलेत, पण…”, हल्लेखोर शरीफुल इस्लामचे पाच महत्त्वाचे कबुलीजबाब
शिवाजी साटम यांची CID 2 मालिकेत लवकरच पुन्हा होणार एन्ट्री? एसपी प्रद्युमन कधीपासून पाहायला मिळणार? जाणून घ्या…
‘सूर्यवंशम’ चित्रपटाआधी अमिताभ बच्चन यांनी सोडलेले बॉलीवूड; सहकलाकाराचा खुलासा, म्हणाले…
“आम्ही मुलासमोर रडूही शकत नव्हतो…”, इमरान हाश्मीने सांगितला कठीण काळ; म्हणाला, “मी आणि माझी पत्नी…”
तुमची आवडती ऑनस्क्रीन जोडी कोणाबरोबर? अशोक सराफ ‘या’ दिग्गज अभिनेत्रीचं नाव घेत म्हणाले, “तिचे सुरुवातीचे चित्रपट…”
‘थांब म्हटलं की थांबायचं…’, अंकुश चौधरीच्या नवीन चित्रपटात स्टार प्रवाहची नायिका प्रमुख भूमिकेत दिसणार, पाहा टीझर
माधुरी दीक्षितचा ‘पंचक’ चित्रपटाचा आज ‘स्टार प्रवाह’ वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर
माधुरी दीक्षित आणि पती श्रीराम नेने निर्मित ‘पंचक’ चित्रपट ५ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह अनेकांनी ‘पंचक’ चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं होतं. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, सतीश आळेकर, भारती आचरेकर, आदिनाथ कोठारे, आनंद इंगळे, सागर तळाशीकर, तेजश्री प्रधान, दीप्ती देवी, आरती वडगबाळकर, नंदिता पाटकर, गणेश मयेकर अशी तगडी कलाकार मंडळी झळकली होती. कोकणातील खोत कुटुंबावर आधारित असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन जयंत जठार व राहुल आवटे यांनी उत्तमरित्या केलं होतं. आज ‘पंचक’ चित्रपटाचा ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर आहे. दुपारी १ वाजता पाहायला मिळणार आहे.
विद्या बालनने सोनाली कुलकर्णीला विमानात पाहिलं अन्…; अभिनेत्रीने सांगितला किस्सा, म्हणाली, “तिचा तो चेहरा…”
“त्याने मला ओळखही दिली नाही”, कपिल शर्माच्या वागणूकीवर ज्येष्ठ अभिनेत्याची नाराजी; म्हणाले, “संपूर्ण देश माझ्या पाया…”
“मी जातोय…”, अमिताभ बच्चन यांची ‘ती’ पोस्ट पाहून चाहते चिंतेत
“जेव्हा देव माणसाचे साचे तयार करत असेल तेव्हा….”, अमिताभ बच्चन यांच्याबद्दल मुकेश खन्नाचं विधान, म्हणाले, “जर मी त्यांच्याआधी इंडस्ट्रीमध्ये…”
सनी देओलच्या ‘जाट’ चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये झाली वाढ, तिसऱ्या दिवशी केली सर्वाधिक कमाई
रत्नागिरीला सुके मासे खाल्ले अन् माझं ब्लड प्रेशर…; अशोक सराफांनी ‘फिटनेस’वर केलं भाष्य; म्हणाले, “त्या दिवसापासून…”
हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”
सनी देओलचा ‘जाट’ चित्रपट १० एप्रिलला प्रदर्शित झाला. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर संथ गतीने सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी सनीच्या ‘जाट’ चित्रपटाने ९.५ कोटींची कमाई केली. पण, दुसर्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली. शुक्रवारी ११ एप्रिलला ‘जाट’ चित्रपटाने फक्त ७ कोटींचा गल्ला जमवला. माहितीनुसार, मुंबईतील ‘जाट’ चित्रपटाचे १०० आणि दिल्ली-एनसीआरमधील ३० असे ४०० हून अधिक शो रद्द केले. याचाच परिणाम ‘जाट’ चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशीच्या कमाईवर झाल्याचं म्हटलं जात आहे.
सुपरस्टार अजित कुमारच्या २०२५ मधील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘गुड बॅड अग्ली’. या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ पाहायला मिळत आहे. १० एप्रिलला प्रदर्शित झालेला ‘गुड बॅड अग्ली’ चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत ५० कोटींचा आकडा पार केला आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, पहिल्या दिवशी अजित कुमारच्या चित्रपटाने २९.२५ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कमाई किंचित घट झाली. १५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. पण तिसऱ्या दिवशी ‘गुड बॅड अग्ली’ चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली. प्रदर्शनानंतरच्या पहिल्या शनिवारी या चित्रपटाने १८.५० कोटींचं कलेक्शन केलं. तीन दिवसांत ‘गुड बॅड अग्ली’ चित्रपटाने एकूण ६२.७५ कोटींची कमाई केली. ज्यामुळे अजित कुमारचा हा चित्रपट ५० कोटींच्या क्लबमध्ये सहज सामील झाला आहे.
‘गुड बॅड अग्ली' चित्रपटाचं पोस्टर ( फोटो सौजन्य – ग्राफिक्स टीम )