Entertainment News Today, 14 April 2025 : बॉक्स ऑफिसवर सध्या सनी देओलच्या ‘जाट’ सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय दाक्षिणात्य चित्रपट ‘गुड बॅड अग्ली’ सुद्धा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसतोय. यामध्ये अभिनेता अजित कुमार प्रमुख भूमिकेत झळकला आहे. सनी देओलच्या ‘जाट’ चित्रपट चौथ्या दिवशीच्या कमाईत सलमान खानच्या ‘सिकंदर’वर भारी पडला आहे. या सिनेमांनी आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर किती कमाई केलीये, तसेच मराठी मनोरंजन विश्वातील इतर घडामोडी जाणून घ्या…
Entertainment News Today, 14 April 2025 : मनोरंजन न्यूज अपडेट
दोन लग्नं मोडली, नवऱ्याला ९३ लाखांची मालमत्ता पोटगी म्हणून दिली; प्रसिद्ध अभिनेत्रीने स्वत:च केला खुलासा, म्हणाली…
"आमचं नातं डेंजर आहे", सिद्धार्थ जाधवचे लेकींबरोबर 'असे' आहे बॉण्डिंग; म्हणाला…
मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण करणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर ‘देवमाणूस’मध्ये पहिल्यांदाच लावणी सादर करणार आहे. हे गाणं एप्रिलमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, सई ताम्हणकरच्या चाहत्यांसाठी तसेच मराठी प्रेक्षकांसाठी ही एक विशेष भेट असणार आहे. पहिल्यांदाच सई मोठ्या पडद्यावर लोककला सादर करताना दिसणार आहे.

'My Forever' म्हणत मराठी अभिनेत्रीने दिली प्रेमाची कबुली! कोळी गाण्यांमुळे मिळाली लोकप्रियता, होणारा नवरा आहे तरी कोण?
७ वर्षांच्या लेकाच्या 'त्या' कृतीमुळे अभिनेत्री झालेली ट्रोल, आता प्रतिक्रिया देत म्हणाली, "थोडी लाज वाटली पाहिजे…"
"जर आपल्यावर झाडू मारायची वेळ आली…", सई ताम्हणकरच्या वडिलांनी दिलेला 'हा' सल्ला; अभिनेत्री काय म्हणाली?
ज्येष्ठ कलाकारांना सवलती मिळायला पाहिजेत का? अतिशा नाईक यांनी दिले 'हे' उत्तर, वाचा
"जर मी तो दिवस बदलू शकले असते तर…", भावाच्या आठवणीत अपूर्वा नेमळेकरची भावुक पोस्ट, म्हणाली, "त्या दिवशी नियतीने…"
काजूच्या बोंडूचं भरीत…; ऐश्वर्या नारकर पोहोचल्या कोकणात! बनवला पारंपरिक पदार्थ; नेटकरी म्हणाले, "सेलिब्रिटी मास्टरशेफ…"
Janhvi Kapoor - 'Happy Vishu and Happy Puthandu!' असं कॅप्शन देत जान्हवी कपूरने चाहत्यांना दिल्या खास शुभेच्छा. साऊथ इंडियन लूकमध्ये शेअर केले फोटो
https://www.instagram.com/p/DIar72Bsuhj/?utm_source=ig_web_copy_link
Fandry : 'फँड्री' फेम जब्या अन् शालू पुन्हा एकत्र झळकणार, शेअर केली झलक; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स...
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ चित्रपट १४ फेब्रुवारी २०१४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमातली जब्या अन् शालूची जोडी आजही सर्वत्र लोकप्रिय आहे. राजेश्वरीने साकारलेली शालू आणि सोमनाथने साकारलेला जब्या या दोन्ही पात्रांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. आता या दोघांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याची झलक सोमनाथ अवघडेने शेअर केली आहे.
https://www.instagram.com/reel/DIYiQplt9er/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
Photos: मुंबईच्या राणी बागेत श्रेया बुगडेचा सफरनामा; म्हणाली ‘परदेशात असणाऱ्या गोष्टींसारख्या…’
या प्राणी संग्रहालयात सध्या शक्ती, करिश्मा ही वाघाची जोडी, अस्वल, हरण, अजगर, तरस आणि पेंग्विन, वाघ, शेकडो प्रकारचे पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस आदी प्रकराचे १३ जातीचे ८४ सस्तन प्राणी, १९ जातींचे १५७ पक्षी आहेत.
निक्की अन् छोटा पुढारी पुन्हा भिडणार! 'आता होऊ दे धिंगाणा'मध्ये रंगणार महाअंतिम सोहळा, पाहा प्रोमो
स्टार प्रवाहवर नवीन कुकिंग शो सुरू होणार आहे. त्यामुळे सिद्धार्थ जाधवचा 'आता होऊ दे धिंगाणा' शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या शोच्या महाअंतिम सोहळ्याला बिग बॉस मराठी फेम निक्की तांबोळी आणि छोटा पुढारी उपस्थित राहणार आहेत.
https://www.instagram.com/reel/DIap2zrN6y7/?utm_source=ig_web_copy_link
आता होऊ दे धिंगाणा- महाअंतिम सोहळा
https://www.instagram.com/reel/DIal9c3NskV/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
इंद्रायणी भात, डाळ अन्…; 'पारू'ने सांगितला तिचा Diet प्लॅन! दिवसभराचा आहार कसा असतो? शरयू सोनावणे म्हणाली…
"माझं मुंबईत घर असावं हे कधीच स्वप्न नव्हतं", 'लक्ष्मी निवास'मधील वीणा नेमकं काय म्हणाली?
ज्ञानदाने 'आता होऊ दे धिंगाणा ३' या कार्यक्रमासाठी खास लूक केला होता.
प्रसिद्ध आर्टिस्ट निलेश खराडे यांनी आशिष पडाळे यांच्या संयोगाने रेखाटले अशोक सराफ यांचं भव्य चित्र
https://www.instagram.com/p/DIMcCaTNnzG/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
अशोक सराफ यांचं भित्तीचित्र
https://www.instagram.com/reel/DIak0uAMlwz/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
"माझा हेतू लोकांना…", 'लग्नानंतर होईलच प्रेम'मधील 'ही' मराठी अभिनेत्री आहे व्यावसायिक ज्योतिषी
ब्रेकअपनंतर चिरंजीवीने तमन्ना भाटियाला दिला 'हा' सल्ला, विजय वर्माबरोबर नातं तुटण्यामागचं खरं कारण आलं समोर
गायिका सोनू कक्करने भावंडांशी तोडले संबंध; शिव ठाकरेच्या प्रतिक्रियेने वेधले लक्ष, म्हणाला, "मला खूप हसायला…"
पृथ्वीक प्रतापकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना, खास व्हिडीओ केला शेअर
"ज्या महामानवामुळे आज माझं अस्तित्व आहे त्या महामानवाच्या म्हणजेच…भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्व भारतीयांना शुभेच्छा!" - अभिनेता पृथ्वीक प्रताप
https://www.instagram.com/reel/DIaWk3FoPGr/?igsh=ampreHA5bHUyeHo0
करीना कपूर पहिल्यांदाच 'या' दाक्षिणात्य अभिनेत्यासह झळकणार, सिनेमाचं नाव सांगत केली घोषणा...
करीना कपूर खानला हिंदी सिनेविश्वात काम करून २५ वर्षे पूर्ण झाली आहे. यानिमित्ताने तिने खास घोषणा केली आहे. अभिनेत्री मेघना गुलजार दिग्दर्शित 'दायरा' सिनेमात झळकणार आहे. यामध्ये करीना पहिल्यांदाच दाक्षिणात्य अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनसह स्क्रीन शेअर करणार आहे.
पाहा पहिली झलक...

कार्तिकी गायकवाडने ११ महिन्यांनी पहिल्यांदाच दाखवला बाळाचा चेहरा, लाडक्या लेकाचं नाव काय ठेवलं? पाहा व्हिडीओ…
प्रसिद्ध मुस्लीम अभिनेत्रीने दोनदा थाटले संसार, दोन्ही पती हिंदू; दुसऱ्या लग्नात तिचा २४ वर्षांचा मुलगा होता उपस्थित
अमोल कोल्हेंची 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा सुरू होणार, केव्हा व कुठे? वाचा...
‘झी मराठी’ वाहिनीवर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका २४ सप्टेंबर २०१७ ते २९ फेब्रुवारी २०२० या कालावधीत प्रसारित केली जात होती. या मालिकेच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा, त्यांनी स्वराज्यासाठी दिलेलं बलिदान, एकदंर त्यांच्या बालपणापासून त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास उलगडण्यात आला होता. डॉ. अमोल कोल्हे यांनी या मालिकेत शंभूराजेंची भूमिका साकारली होती.
ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता प्रेक्षकांना 'झी युवा' वाहिनीवर पाहता येणार आहे.
https://www.instagram.com/p/DIYo9sISn0k/?igsh=MWR0bTRxbjYzb3Mz
सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाला १ कोटींची कमाई करणं झालं कठीण, १५व्या दिवशी फक्त 'इतक्या' लाखांचा गल्ला जमवला
सनी देओलचा 'जाट' सिनेमा १० एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने चौथ्या दिवशी म्हणजेच रविवारी १४ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे या सिनेमाचं एकूण कलेक्शन ४०.२७ कोटी झालं आहे, असं वृत्त सॅकनिल्कने दिलं आहे.
याउलट सलमान खानच्या 'सिकंदर'ने चौथ्या दिवशी केवळ ९.७५ कोटी कमावले होते. त्यामुळे चौथ्या दिवशीच्या कमाईत सनी देओलचा 'जाट' सिनेमा सलमान खानच्या चित्रपटावर भारी पडला आहे.
Entertainment News Today, 14 April 2025 : मनोरंजन न्यूज अपडेट
सनी देओलच्या 'जाट' सिनेमाचं कलेक्शन