सिनेविश्वात कधी सेलिब्रिटींच्या लग्नाची चर्चा असते, तर कधी त्यांना होणाऱ्या बाळाची… अनेकदा बड्या स्टार्सचे सिनेमे ट्रेडिंग होत असतात तर, कधी बॉलीवूडमधले अंतर्गत गॉसिप्स चर्चेचा विषय ठरतात. मनोरंजन विश्वातील अशाच ताज्या घडामोडी, चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन, मालिकाविश्वातील अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर…
Entertainment News Today, 16 April 2025 : मनोरंजन विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी
अंथरूणाला खिळलेल्या मधुबालाला किशोर कुमारांनी एकटं…; बहिणीचा मोठा खुलासा, जाणून घ्या ट्रॅजेडी क्वीनबरोबर काय घडलं?
'सत्या'मधल्या भिकू म्हात्रेसाठी मनोज वाजेपेयींनी घेतलेलं 'इतकं' मानधन, रक्कम ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
किरण मानेंनी शेअर केला 'लई आवडतेस तू मला' मालिकेच्या सेटवरील फोटो; म्हणाले, "प्रबोधनाच्या कामातून थोडा ब्रेक घेतो"
'आता होऊ दे धिंगाणा ३'च्या महाअंतिम सोहळ्यात विजेत्या टीमला मिळणार 'ही' गोष्ट, पाहा व्हिडीओ
"माझ्या डोळ्यात अश्रू…", अपूर्वा नेमळेकरने वडिलांसाठी केली भावुक पोस्ट; म्हणाली, "तुमच्याशिवाय जगून…"
राहा कपूरने आईसाठी बनवलं खास जेवण, आलिया भट्ट फोटो शेअर करत म्हणाली...
Raha Kapoor & Alia Bhatt : राहा कपूरने आई आलिया भट्टसाठी खास जेवण बनवलं आहे. हा फोटो शेअर करत अभिनेत्री लिहिते, "माझ्या आवडत्या शेफने माझ्यासाठी खास जेवण बनवलं आहे."

Khushi Kapoor - खुशी कपूरने दिली प्रेमाची कबुली? गळ्यातील 'त्या' लॉकेटने वेधलं लक्ष, कथित बॉयफ्रेंड वेदांग रैनाशी आहे खास कनेक्शन
Khushi Kapoor Relationship : Khushi Kapoor Necklace : अभिनेत्री खुशी कपूरचं नाव गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता वेदांग रैनाशी जोडलं जात आहे. अशातच तिने शेअर केलेली इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत आली आहे. खुशीच्या गळ्यातील नेकलेसने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या नेकलेसमध्ये 'V' लव्ह 'K' असं लिहिलेलं लॉकेट आहे. यामुळे खुशीने रिलेशनशिपची जाहीर कबुली दिल्याच्या चर्चा चालू आहेत.
https://www.instagram.com/p/DIfxEklR2WS/?utm_source=ig_web_copy_link
अरबाज खानची दुसरी पत्नी प्रेग्नेंट आहे की नाही? 'या' हॉस्पिटलला दिली भेट, व्हिडीओ व्हायरल
छाया कदम यांनी व्हिडीओ शेअर करीत दाखविली घरातील आवडती जागा, पाहा व्हिडीओ
लोकप्रिय अभिनेत्री छाया कदम यांनी सोशल मीडियावर काही फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्यांनी घरातील त्यांची आवडती जागा दाखविली आहे. तर एका फोटोमध्ये आंब्याचा रायता हा पदार्थदेखील पाहायला मिळत आहे.
https://www.instagram.com/p/DIf5QTBNDGr/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
"मनातल्या भावना तुझ्या प्रेमासाठी…"; सुरू होणार पारू व आदित्यच्या प्रेमाचा प्रवास, पाहा प्रोमो
काही दिवसांपूर्वीच गौहर खानने व्हिडीओ शेअर करीत दुसऱ्यांदा आई होणार असल्याचे सांगितले होते. २०२० मध्ये गौहर खान व झैद दरबार यांनी लग्नगाठ बांधली होती. गौहरने ही आनंदाची बातमी दिल्यावर चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील जवळच्या लोकांनी कमेंट्समध्ये तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळाले. याबरोबरच, ही बातमी शेअर केल्यानंतर ती रॅम्प वॉकही करताना दिसली होती. आता तिने एका मुलाखतीत खुलासा केला आहे की जेव्हा ती पहिल्यांदा गरोदर होती, तेव्हादेखील तिने रॅम्प वॉक केला होता. तसेच, चौथ्या महिन्यापर्यंत तिने एका अॅक्शन शोचे शूटिंगदेखील केले होते.

'लाखात एक आमचा दादा' मालिकेतील तुळजाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
https://www.instagram.com/p/DIfxRy_zAxs/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
"रोज वेगळं नाव लावून…", सलील कुलकर्णींची ट्रोलर्सना सणसणीत चपराक, म्हणाले, "खोटी नावे आणि फसवे रूप…"
"प्रवीण तरडेंबरोबर काम केलेला नट…", मराठी अभिनेता क्षितिश दाते काय म्हणाला?
Sagarika Ghatge and Zaheer Khan Baby Baby Boy - अभिनेत्री सागरिका घाटगे आणि भारतीय क्रिकेटर झहीर खानच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. सागरिकाने एका चिमुकल्या मुलाला जन्म दिला आहे. मुलाचं नाव सांगत दोघांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. Fatehsinh Khan असं सागरिका व झहीरच्या मुलाचं नाव आहे.
https://www.instagram.com/p/DIfrQj8K_z5/?igsh=MTU0dzBvdmgxMDdzdQ%3D%3D&img_index=1
शरद पोंक्षेंची अविनाश नारकरांसाठी खास पोस्ट; २५ वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करीत म्हणाले, "१९८९ ला बेस्टमध्ये…"
Pooja Sawant : पूजा सावंतने नवऱ्याला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
पूजा सावंतने नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
https://www.instagram.com/p/DIfk_CaT5Yb/?igsh=MTNuam1kZWhqZ3dsdw==
२७ वर्षांनी रंगभूमीवर कमबॅक! अलका कुबल यांचा हटके लूक पाहिलात का? सोबतीला असेल मालिकाविश्वातील 'हा' लोकप्रिय अभिनेता
Salman Khan Sikandar Movie Collection : सलमान खानच्या 'सिकंदर'ने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. मात्र, चित्रपटाचं मूळ बजेट अद्याप वसूल झालेलं नाही. 'सिकंदर'ने १६ व्या दिवशी २९ लाख तर, १७ व्या दिवशी फक्त २५ लाखांचा गल्ला जमावला आहे. आतापर्यंत या सिनेमाची एकूण कमाई फक्त १०९.६४ कोटी झाली आहे.
Jaat Movie Box Office Collection : सनी देओलच्या 'जाट' सिनेमाच्या कमाईत मोठी घसरण, ६ व्या दिवशी कमावले फक्त...
सनी देओलच्या 'जाट' सिनेमाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाहीये. सिनेमाने सहाव्या दिवशी ( मंगळवार १५ एप्रिल ) अवघ्या ५.७५ कोटींची कमाई केली आहे. यामुळे सिनेमाचं सहा दिवसांचं एकूण कलेक्शन फक्त ५३ कोटी झालं आहे. आता येत्या काळात हा सिनेमा १०० कोटींचा टप्पा गाठणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Arbaaz Khan Second Wife shura Khan Pregnancy Rumors : बॉलीवूड अभिनेता अरबाज खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वयाच्या ५७ वर्षी अरबाज खान पुन्हा बाबा होणार आहे. त्याची दुसरी पत्नी शुरा त्याच्यापेक्षा जवळपास २५ वर्षांनी लहान आहे. हे दोघंही क्लिनिक बाहेर एकत्र दिसल्याने शुरा गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पिंकव्हिलाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. अनेकांनी कमेंट्समध्ये शुराचा बेबी बंप दिसत असल्याचंही म्हटलं आहे.
https://www.instagram.com/reel/DIeItOey0Y8/?igsh=MTJycTFwdnVxNmR1Mg==
Entertainment News Today - बॉलीवूड गॉसिप्स व चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन-सध्या बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य चित्रपट ‘गुड बॅड अग्ली’ धुमाकूळ घालताना दिसत आहे. 'सिकंदर' व सनी देओलच्या 'जाट' सिनेमावर अजित कुमारचा सिनेमा चांगलाच भारी पडला आहे. तर, मराठी सिनेसृष्टीत ‘अशी ही जमवा जमवी’, ‘जयभीम पँथर’, ‘पावटॉलॉजी’ हे नवे चित्रपट नुकतेच प्रदर्शित झाले आहेत. तर मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट येत आहेत. आजच्या दिवसभरातील सिनेसृष्टी आणि मालिकाविश्वातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या….