‘मल्टिलेव्हल मार्केटिंग’ क्षेत्रातील ‘क्यूनेट’ कंपनीकडून झालेल्या ४२५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात अभिनेता बोमन इराणीचा मुलगा दानेश याचा काय संबंध आहे, हे पडताळून पाहणाऱ्या मुंबई पोलीसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने (इओडब्ल्यू) दानेशचे बॅंक खाते गोठवले आहे.
या महिन्याच्या सुरूवातीला ‘इओडब्ल्यू’ने गुरप्रित आनंदच्या ‘क्यूनेट’ संदर्भातील तक्रारीवरून दानेशविरुध्द तपास सुरू केला. सोमवारी ‘इओडब्ल्यू’ने दानेशचे प्रायव्हेट बॅंकेतील खाते गोठवले. ‘इओडब्ल्यू’च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनूसार २८ आणि ३० लाख रुपयांच्या दोन मुदत ठेवी असलेले दानेशचे बॅंक खाते गोठविण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी अधिक तपास केला असता दानेशला ‘क्यूनेट’कडून ४० लाख रूपये मिळाल्याचे देखील या अधिकाऱ्यांकडून समजले. हे पैसे कशाच्या मोबदल्यात मिळाले याची पोलिस खातरजमा करून घेत आहेत. लवकरच दानेशला समन्स बजावण्यात येणार आहे. पोलिस चौकशीसाठी हजर होताच ‘क्यूनेट’मधील त्याची भूमिका आणि कशाच्या मोबदल्यात त्याला हा पैसा मिळाला हे पोलिस जाणून घेणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा