छोट्या पडद्यावरील अभिनेत्री एरिका फर्नांडिस ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. पण तिने मॉडेलिंगनंतर करिअरची खरी सुरुवात ही दाक्षिणात्य चित्रपटातून केली होती, एरिकाने २०१३ मध्ये दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते. एवढंच काय तर तिने ७ ते ८ चित्रपटांमध्ये काम केले होते. पण एरिकाला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतला अनुभव खूपच वाईट होता. याविषयी तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
एरिकाने नुकतीच बॉलिवूड बबलला मुलाखत दिली होती. यावेळी एरिकाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत तिच्या शरीराची लाज काढली जात होती आणि तिला पॅडने भरायचे. यामुळे एरिकाला अपमानास्पद वाटले होते. २०१७ मध्ये एरिकाचा शेवटचा दाक्षिणात्या चित्रपट प्रदर्शित झाला होता.
यावेळी एरिका म्हणाली, मी खूप बारीक आणि लाजाळू होती. त्यावेळी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनेत्रीकडून ते लोक जी अपेक्षा करत होते तशी मी नव्हते. कारण त्यांना मादक स्त्री पाहिजे होती म्हणून ते मला पॅडने भरायचे. मी खूप पॅडिंग घालायचे. मांड्यांवरील पॅड्सपासून सगळीकडे भरपूर पॅड घालायचे. मला यामुळे अपमान वाटत होता. याचा अर्थ तुम्ही त्या व्यक्तीला जसा आहे तसे स्वीकारत नाही. मला खूप अस्वस्थ वाटत होते. ते सगळीकडे पॅडिंग लावायचे. माझ्याकडे मांड्यांवरील पॅड्स होते. पण मला आनंद आहे की आता परिस्थिती तशी नाही.
Photo : घरात दोनचं खुर्च्या? भारती सिंगचे आलिशान घर पाहिलेत का?
एरिकाने २०१६ मध्ये छोट्या पडद्यावरून पदार्पण केले. एरिकाने ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या शोमध्ये पहिल्यांदा काम केले होते. या मालिकेत तिने सोनाक्षी बोसची भूमिका साकारली होती. एरिकाची ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. एरिकाने ‘कसौटी जिंदगी के’ आणि ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी- नई पेहचान’मध्ये दिसली होती. तिने काही म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे.