संजय लीला भन्साळी यांच्या ‘बाजीराव-मस्तानी’ या आगामी चित्रपटाला अद्याप सुरुवातदेखील झालेली नाही आणि हा चित्रपट कमालीचा चर्चेत आहे. गल्या अनेक वर्षापासून संजय लीला भन्साळींच्या मनात हा चित्रपट बनविण्याचा विचार घोळत होता, जो आता प्रत्यक्षात उतरत आहे. ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटातील दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि प्रियांका चोप्रा या तगड्या स्टारकास्टने अगोदरच अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता, या चित्रपटासंदर्भातली आणखी एक मोठी बातमी हाती लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ‘इरॉस इंटरनॅशनल’ने चित्रपटाला सुरुवात होण्या अगोदरच अंदाजे १२५ कोटी इतक्या किंमतीला ‘बाजिराव-मस्तानी’चे अधिकार विकत घेतले आहेत. भन्साळी आणि इरॉस यांची अनेक वर्षापासून जवळीक असून, याआधी आलेल्या ‘गोलियों की रासलीला – राम लीला’ या त्यांच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट कामगिरी केली. ‘बाजीराव-मस्तानी’बाबतची अधिकृत घोषणा होणे अद्याप बाकी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा