बॉलिवूड अभिनेत्री इशा गुप्ता गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. तिने शेअर केलेले टॉपलेस आणि न्यूड फोटो यासाठी निमित्त ठरले आहेत. इशाने इन्स्टाग्रामवर स्वत:चे न्यूड फोटो शेअर केल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केले. पण, याने इशाला काहीच फरक पडला नाही. याप्रकारच्या प्रतिक्रिया येणं मला अपेक्षित होते, असे तिने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.
आपल्या न्यूड फोटोबद्दल इशा म्हणाली की, ‘आपल्या देशात कायमच स्त्रियांना दोष देण्यात आलाय. मुलीचा जन्म झाला किंवा तिच्यावर बलात्कार झाला तरी तिलाच दोषी ठरवण्यात येतं. त्यामुळे कुठेतरी अशा प्रतिक्रयांना मलाही सामोरे जावे लागणार याची जाणीव होती. शेवटी, चेहरा नसलेल्या लोकांना संधी मिळताच सेलिब्रिटींवर निशाणा साधणे अगदी सोपे असते. मी मॉडेल असताना अशाप्रकारचे शूट केले होते. तेव्हा मी टॉपलेस झाले. इतकेच नाही तर मी पूर्ण नग्नही झाले. कोणीही मला त्याबद्दल विचारले नाही. माझ्या फोटोंवर आपत्ती दर्शवणारे हे लोक आहे तरी कोण? हे माझं शरीर आहे आणि ते खरंच खूप सुंदर दिसतं.’
वाचा : या बॉलिवूड अभिनेत्रीने पाकिस्तानला म्हटले ‘आझादी मुबारक’, मिका सिंग भडकला
पुढे इशा म्हणाली की, एक ठराविक सीमा ओलांडली की ते अश्लिल वाटतं. मात्र माझे फोटो अश्लिल आहेत, असे कोणीही म्हणणार नाही. मला तिरस्कारापेक्षा प्रेमच अधिक मिळालं. पण विसरून जाण्यापेक्षा तिरस्कार केव्हाही चांगला. पुरुषी मानसिकतेविषयी बोलताना इशा म्हणाली की, स्त्रिया जर बोल्ड वागायल्या लागल्या तर पुरुषांना त्यांच्यासमोर खूप मोठी समस्या असल्यासारखे वाटते. कारण त्यामुळे त्यांच्या पुरुषी प्रवृत्तीला आव्हान दिल्यासारखं होतं. ते सभ्य झाले आहेत. उलट त्यांना हे फोटो फोनमध्ये सेव्ह करून ठेवायला हवेत. माझे फोटो इतके सुंदर आले आहेत की, ते मी कधीच परत मागे घेणार नाही. माझ्या शरीरवर माझा पूर्ण विश्वास असून मला त्याविषयी अजिबात अवघडल्यासारखं वाटत नाही.
वाचा : .. म्हणून राणा डग्गुबतीचा आनंद गगनात मावेना
इशावर टीका करणाऱ्यांसाठी तिची ही मुलाखत सडेतोड उत्तर आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. लवकरच ती ‘बादशाहो’ या चित्रपटात दिसणार असून, यामध्ये अजय देवगण, इम्रान हाश्मी, इलियाना डिक्रूझ आणि विद्युत जामवाल यांच्याही भूमिका आहेत. ‘बादशाहो’ चित्रपट १ सप्टेंबरला प्रदर्शित होईल.