‘बालक पालक’ आणि ‘टाइमपास’ या लोकप्रिय चित्रपटांचे दिग्दर्शक रवी जाधव आता तुलनेत नव्या दिग्दर्शकाच्या चित्रपटाचे ‘प्रमोशन’ करणार आहेत. आजच्या तरुणाईपर्यंत ‘रेगे’ हा चित्रपट अधिक प्रभावीपणे पोहोचावा, त्यासाठी जाधव यांनी आपल्या खास पद्धतीने हा चित्रपट प्रस्तुत करण्याचे ठरविले आहे. अभिजित पानसे लिखित आणि दिग्दर्शित ‘रेगे’ हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
पोलीस दलात आणि समाजातही खळबळ उडवून देणाऱ्या एका एन्काऊंटर प्रकरणाचा संदर्भ या चित्रपटाला आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मामि), पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, दक्षिण आफ्रिका
रवी जाधव यांनी ‘मामि’ व गोवा चित्रपट महोत्सवात हा चित्रपट पाहिला आणि ते प्रभावित झाले. ‘बालक पालक’ आणि ‘टाइमपास’ या चित्रपटातून जाधव यांनी पौंगडावस्थेतील मुलांचे भावविश्व रेखाटले होते. ‘रेगे’ चित्रपटात त्यापुढील वयात आलेल्या तरुणांच्या भावविश्वातील निर्णायक वळणावरचा प्रवास चित्रीत करण्यात आला आहे.
मराठीतील एक यशस्वी दिग्दर्शक तुलनेत नव्या असलेल्या दिग्दर्शकाचा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आपणहून पुढे येतो, ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी आनंदाची आणि दिलासा देणारी बाब असल्याची प्रतिक्रिया या निमित्ताने व्यक्त करण्यात येत आहे. याआधी रवी जाधव यांनी नागराज मंजुळे यांच्या ‘फॅण्ड्री’ चित्रपटालाही प्रचारतंत्रासाठी मार्गदर्शन केले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा