सौंदर्य आणि कला यांचा अनोखा संगम म्हणजे रेखा! सौंदर्य, अभिनय आणि गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी मजल मारली. आजही त्या तेवढ्याच सुंदर आणि उत्साही दिसतात. बॉलिवूडमध्ये आपल्या सदाबहार अभिनयाने आतापर्यंत अधिराज्य गाजवत आलेल्या अभिनेत्री रेखा यांचा आज ६०वा वाढदिवस आहे.
रेखा यांचे खरे नाव भानुरेखा गणेशन. पण, अजूनही बऱ्याचशा लोकांना हे नाव चटकन आठवणार नाही. बेबी रेखा या नावाने त्यांनी प्रथम तेलगू चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. १९७० मध्ये ‘सावन भादों’ या चित्रपटापासून त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यांच्या सौदर्यावर न भाळलेली व्यक्ती दुर्मिळच. १९८१ साली आलेल्या मुजफ्फर अली निर्मित ‘उमराव जान’ने रेखा यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. त्यांनी आत्तापर्यंत १८० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या प्रत्येक भूमिकेत त्यांनी आपलं वेगळेपण सिद्ध् केले आहे. आता लवकरचं त्यांचा सुपरनानी हा चित्रपटदेखील प्रदर्शित होत आहे. १९८० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फटाकडी’ या मराठी चित्रपटामध्ये ‘कुठं कुठंठ जायाच हनिमुनला..’ या लावणीवर त्यांनी केलेले नृत्य प्रचंड गाजले. रेखा या राज्यसभा सदस्य आहेत. राष्ट्रपतींच्या विशेष अधिकाराने मे २०१२ मध्ये त्यांची राज्यसभेवर नेमणूक झाली.
अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या जोडीला आजही प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलेले आहे. ही जोडी बॉलिवूडमधली हीट जोडी ठरली होती. अभिताभ बरोबर चित्रीत झालेला ‘सिलसिला’ हीट चित्रपट ठरला होता. संयोगाची गोष्ट म्हणजे, आज रेखा यांचा वाढदिवस आहे आणि बीग बी अमिताभ यांचा उद्या म्हणजे ११ ऑक्टोबरला.
रेखा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रतिक्रियांच्या माध्यमातून तुम्ही देऊ शकता.
एव्हरग्रीन रेखा @६०
बॉलिवूडमध्ये आपल्या सदाबहार अभिनयाने आतापर्यंत अधिराज्य गाजवत आलेल्या अभिनेत्री रेखा यांचा आज ६०वा वाढदिवस आहे.
आणखी वाचा
First published on: 10-10-2014 at 10:48 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Evergreen rekha celebrating her 60th birthday