बॉलीवूड ही खूप मोठी इंडस्ट्री आहे. या इंडस्ट्रीमध्ये बहुतेकांना असुरक्षित वाटते. पण त्यापैकी काहीजणच आपल्या भावना सर्वांसमोर बोलून दाखवितात. त्यांच्यापैकीच एक म्हणजे विद्या बालन.
डार्क थिंग्स या नोव्हेलच्या प्रकाशनाला विद्या उपस्थित होती. त्यावेळी विद्याला बॉलिवूडमधील तीन भितीदायक गोष्टी कुठल्या वाटतात असा प्रश्न विचारण्यात आला होता. याचे उत्तर देताना ती म्हणाली, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे शूटींग संपल्यानंतरचा स्टुडिओ, मध्यरात्री सुरू झालेली पार्टी आणि तिसरी गोष्ट म्हणजे इंडस्ट्रीमध्ये सतत भासणारी असुरक्षितता. खरंतर या इंडिस्ट्रीत प्रत्येकाला असुरक्षित वाटत असते. ही मानवी भावना आहे. आमच्याबद्दलच्या प्रत्येक गोष्टीबाबत लिहले जाते. तसेच, आमच्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीवर बारीक लक्ष ठेवले जाते याच कारणामुळे बॉलीवूडमध्ये प्रत्येकाला असुरक्षित वाटते.
विद्या सध्या ‘Te3n’या सुजॉय घोषच्या चित्रपटात काम करत आहे. रिभू दासगुप्ता दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
बॉलीवूडमध्ये असुरक्षित वाटते – विद्या बालन
आमच्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीवर बारीक लक्ष ठेवले जाते.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:
First published on: 02-02-2016 at 14:29 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Every actor feels insecure in bollywood vidya balan