तुमच्यासोबत जर योग्य व्यक्ती असेल तर प्रत्येक दिवस हा व्हॅलेंटाईन डे असू शकतो अशी प्रतिक्रिया सध्या बिपाशा बासूच्या प्रेमात पडलेल्या करण सिंग ग्रोव्हरने दिली आहे.
व्हॅलेंटाईन डेसाठी केलेल्या प्लॅनबाबत विचारले असता करण म्हणाला, व्हॅलेंटाईन डेसाठी मी कोणताही प्लॅन केलेला नाही. माझ्यासाठी हा दिवस इतर दिवसांसारखाच असतो. जर तुमच्यासोबत योग्य व्यक्ती असेल तर तुमचा प्रत्येक दिवस व्हॅलेंटाईन डे असतो. पण माझा वाढदिवस आता जवळच आला आहे. त्यामुळे आम्ही बाहेर फिरायला जायचे ठरवले आहे.
करण सिंग ग्रोव्हरचा त्याची दुसरी पत्नी जेनिफर विंगेट हिच्याबरोबर लवकरच घटस्फोट होणार आहे. नुकतेच करण आणि बिपाशाने नवर्वर्षाचे सेलिब्रेशन एकत्र साजरे केले होते. तसेच करणने नवर्वर्षाचे सेलिब्रेशन बरोबर बिपाशाचा वाढदिवस सुद्धा परदेशात एकत्र साजरा केला. त्यामुळे करण आणि बिपाशामध्ये प्रेमसंबंध असल्याच्या चर्चांना अधिक उधाण आले आहे.

Story img Loader