मराठमोळ्या अभिनेत्री कायमच चर्चेत असतात. आपल्या अभिनयाने, लूकमुळे आणि फोटोशूटमुळे त्या कायमच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. सध्या ख्रिसमस आणि न्यू इअरच्या निमिताने अनेक सेलिब्रेटी फिरण्यासाठी देशात परदेशात गेले आहेत. बिग बॉसमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री रुचिरा जाधव हिने आपल्या सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रुचिरा जाधव बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामध्ये सहभागी झाली होती. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यापासून रुचिरा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय झाली आहे. नुकतीच ती काश्मीरमध्ये फिरायला गेली असताना तिने फोटो शेअर केला आहे. फोटोत तिने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. केस मोकळे सोडले आहेत. तिचा हा लूक पाहताच तिचे चाहते खुश झाले आहेत.

निळ्या रंगाची बिकिनी, हातात पिझ्झा, पूजा बेदीची लेक करतेय पार्टी; फोटो व्हायरल

बिग बॉस कार्यक्रमात ती आणखीन चर्चेत आली ती म्हणजे तिच्या बॉयफ्रेंड डॉ. रोहित शिंदेमुळे, या पर्वात दोघे सहभागी झाले होते. सुरुवातीला गोडीगुलाबीने वावरणाऱ्या या जोडीमध्ये हळूहळू मतभेद व्हायला लागले, सध्या त्या दोघांच्याही रिलेशनशिपमध्ये फूट पडली. रुचिराने त्याला अनफॉलो केले आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून रुचिरा याबद्दल विविध पोस्ट करताना दिसत आहे.

रुचिरा मूळची मुंबईची असून, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली. ‘लकडाऊन’, ‘सोबत’ या मराठी चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.