मॉडेलिंगच्या ग्लॅमरस दुनियेतून नन होण्यापर्यंतच्या निर्णयासाठी आणि पुन्हा एकदा यु टर्न घेत मॉडेलिंग विश्वात परत येणाऱ्या सोफिया हयातचीच सध्या प्रचंड चर्चा आहे. सोफिया हयातमध्ये झालेला बदल पाहून काही दिवसांपूर्वी अनेकांनाच धक्काच बसला होता. आपल्या मादक सौंदर्याची प्रतिमा दूर करत सोफिया हयातने काही महिन्यांपूर्वी ‘नन’ होण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यानंतर तिने पुन्हा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर अपलोड केले होते. सोफियाने इन्ट्राग्रामवर एक व्हिडिओही अपलोड केला होता. ज्यात ती तिचा बोल्ड लूक दाखवताना दिसली. या व्हिडिओमध्ये सुरुवातीला ती एका ननच्या पोशाखात दिसते तर नंतर साध्या टि-शर्टमध्ये दिसते. त्यानंतर ती डोकं पूर्णपणे झाकलेल्या अवतारात दिसली, शेवटी तर ती दाढी वाढवलेल्या एका पुरुषाच्या रुपातही दिसली होती.
काही दिवसांपूर्वीच आयटम गर्ल राखी सावंत आणि सोफिया हयात यांच्यात सोशल मीडियावर शाब्दिक चकमक झाली होती. एक हॉट फोटो शेअर करणाऱ्या सोफियाला ‘आता तू आई राहिली नाहीस का?’ असा प्रश्न राखीने विचारला होता. राखीच्या आणि इतर टिकाकारांच्या प्रश्नाला उत्तर देत सोफियानेही उत्तर दिले आहे. ‘माझ्या शरीरप्रदर्शनाची जे निंदा करत आहेत, त्यांना माझे एवढेच सांगणे आहे की, मी रामदेवबाबांपेक्षातरी जास्त कपडे घातले आहेत. आपले देव फार सुंदर आहेत. काहीही न जाणता कोणा एकाविषयी अंदाज वर्तवण्यापेक्षा आधी स्वत: चा विचार करण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे.
याआधीही सोफिया शंकरावर केलेल्या विधानामुळे चर्चेत आली होती. काही काळापूर्वी तिने आपण मदर मेरीचा अवतार असल्याचे सांगत ‘शिवा’ला जन्म दिल्याचे म्हटले होते. आता नन झाल्यानंतर पोस्ट केलेले मादक फोटो आणि व्हिडिओमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली. या व्हिडिओमध्ये ती सारखी, ‘नमस्कार मी गाया सोफिया आहे,’ असेच बोलताना दिसली होती. त्यानंतर सोफियाने तिचा एक नवा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. याच फोटोला निशाणा बनवत राखी सावंतने तिच्या या आई बनण्याच्या विधानाला हेरत सोशल मीडियावर तिला टोला लगावला होता. सोफिया प्रमाणेच राखी सावंतसुद्धा तिच्या सोशल नेटवर्किंग साईट्सवरील पोस्ट्समुळे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. काही दिवसांपूर्वी राखीने परदेशात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो असणाऱ्या एका ड्रेसमधील फोटो पोस्ट केल्यामुळे ती चर्चेत आली होती.