बॉलीवूडमधील पूर्वाश्रमीचे प्रेमीयुगूल करिना कपूर खान आणि शाहीद कपूर त्यांच्या बॉलीवूडमधील पदार्पणाच्या काळात फार चर्चेत होते. तसेच, ते एकमेकांना डेट करत असताना आपल्या नात्याबद्दलही माध्यमांमध्ये बोलायचे.
पण, करिना आणि शाहीदने त्यांच्या ब्रेक-अपनंतर एकमेकांपासून लांब राहणेच पसंत केले. पार्टीमध्ये किंवा कार्यक्रमात हे दोघेजण समोरासमोर येणे टाळत असत. पण या सगळ्या भूतकाळातल्या गोष्टी झाल्या. नुकताच टम्पा बे, फ्लोरिडा येथे पार पडलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यात करिना आणि शाहीद एकमेकांसमोर आले. मात्र यावेळेस करिनाने हॅलो शाहीद! असे म्हणून त्याची भेट घेतली. या दोघांनीही आपल्या भूतकाळाला मागे सारून नव्या त-हेने आयुष्य सुरु केले आहे. करिना सैफसोबत सुखी संसारात गुंतली आहे. तर शाहीदचेही प्रियांका चोप्रा आणि आता सोनाक्षी सिन्हा या बॉलीवूड सुंदरींसोबत नाव जोडले गेले आहे.