इम्तियाज अलीच्या आगामी ‘तमाशा’ या चित्रपटात बॉलीवूडमधील पूर्वाश्रमीचे प्रियकर रणबीर-दीपिका हे पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच मुंबईच्या मेहबूब स्टुडिओमध्ये पूर्ण करण्यात आले. यावेळी चित्रपटाची संपूर्ण युनिट भावूक झाली होती. विशेष म्हणजे, रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण दोघे पूर्ण यूनिट समोर रडले. सेटवरील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाचे काम पूर्ण झाल्यावर संपूर्ण युनिट भावूक झाले होते. त्यावेळी रणबीर-दीपिकाच्या डोळ्यातही अश्रू आले त्यामुळे आम्हाला धक्काच बसला. कारण दोघे कधीच आपल्या भावना सार्वजनिक ठिकाणी व्यक्त करत नाहीत.’
यूनिटच्या एका दुस-या सूत्राच्या सांगण्यानुसार, ‘दोघे भावूक झाले कारण, दोघे प्रेमींपासून मित्र बनले आहेत आणि अजून आपले नाते त्यांना घट्ट वाटते. आता त्यांच्या आयुष्यात दुस-या व्यक्ती आल्या आहेत. शेवटी एकमेकांना गुडबाय म्हणणे कठिणचं असतं.

Story img Loader