होय, बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण ‘तमाशा’ करण्यासाठी सज्ज झाले आहेत. परंतु, हा ‘तमाशा’ आहे पडद्यावरचा.
प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या ‘तमाशा’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरूवात होणार आहे. यामध्ये ‘बचना ए हसीनो’ आणि ‘ये जवानी है दिवानी’ फेम रणबीर-दिपीका जोडीची ‘रोमॅन्टीक केमिस्ट्री’ चाहत्यांना अनुभवता येणार आहे.
रणबीर-दिपीका जोडीचे याआधीचे हे दोन्ही चित्रपट तिकीट बारीवर चांगली कमाल करू शकले होते. त्यामुळे तमाशा चित्रपटाच्या माध्यमातूनही या जोडीला चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. चित्रपटाचे मूळ शिर्षक ‘विंडो सिट’ असे निश्चित करण्यात आले होते परंतु, त्यानंतर बदलून ‘तमाशा’ असे करण्यात आले आहे. या चित्रपटातील गाण्यांना सुप्रसिद्ध संगितकार ए.आर.रेहमान यांचे संगित असणार आहे. येत्या जून महिन्यात ‘तमाशा’ सिनेरसिकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. 

Story img Loader