व्हेनेझुएलाची माजी सुंदरी व दुरचित्रवाणी कलाकार मोनिका स्पीयर व तिच्या आयरीश पती थॉमस बेरी याची मंगळवारी संध्याकाळी त्यांच्याच गाडीमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हल्ल्यामध्ये मोनिकाची पाच वर्षांची मुलगी जखमी झाली असून तिला रूग्णलयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
वेलेंसियाकडून प्यूर्तोला जाणाऱ्या रस्त्यावर मोनिका व तिच्या पतीची हत्या करण्यात आली आसून, व्हेनेझुएला पोलिसांनी या हत्याकांडाचा तपास सुरू केला आहे.
मोनिका स्पीयरला २००४ मध्ये मिस व्हेनेझुएलाचा खिताब पटकावला होता. त्या नंतर काही दुरचित्रवाणी मालिकांमधून २९ वर्षीय मोनिका दिसली होती. चोरीच्या उद्देशानेच या दोघांची हत्याकरण्यात आली असलाचा पोलिसांचा संशय आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा