आशिया चषक स्पर्धेमध्ये अगदी शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या भारत-पाकिस्तान सामना भारताने पाच गडी राखून जिंकला. या विजयासह भारताने गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढला. भारत पाक क्रिकेटचा सामना नेहमीच रंगतो. भारत पाक संघ जरी मैदानात एकमेकांना आव्हान देत असले तरी मैदानाबाहेर एकमेकांचे चांगले मित्र आहेत. खिलाडूवृत्तीने एकमेकांशी वागत असतात. रावळपिंडी एक्सप्रेस अशी ओळख असेलला खेळाडू म्हणजे शोएब अख्तर, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज.
क्रिकेटमधून निवृत्त झाल्यांनतर त्याने स्पोर्टसकिडाच्या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्याने भारताबद्दल आणि बॉलिवूडच्या दोन अभिनेत्यांबद्दलच्या आठवणी सांगितल्या आहेत. मुलाखतीती तो म्हणाला की, ‘मला नेहमीच मुंबईच्या लोकांबरोबर संवाद साधत असतो. सलमान आणि शाहरूख खान दोघांनी मला कायमच लहान भावाप्रमाणे सांभाळले आहे. मी जेव्हा जेव्हा त्यांच्या कुटुंबियांसोबत मित्रमैत्रिणींसोबत असायचो ते नेहमीच माझी काळजी घेत असतं तसेच मी सुरक्षित असल्याची जाणीव देखील ते करत असतं’.
तो पुढ असेही म्हणाला, ‘दुर्दैवाने, पाच वर्षे झाली, मी भारतात येऊ शकलो नाही. पण एक वेळ अशीही आली होती की मी तिथे इतके काम केले की लोक मला माझे आधार आणि रेशन कार्ड बनवायला सांगू लागले होते’. शोएब अख्तरने आयपीएलमध्ये देखील सामील झाला होता. शाहरुख खानच्या केआरके कोलकाता नाईट रायडर्स या संघात तो खेळाडू होता. कोलकाता नाईट रायडर्समध्ये त्याने उत्तम कामगिरी केली होती.
शोएब अख्तर मूळचा रावळपिंडी येथील एका गावातला. १९९३,९४ च्या आसपास त्याने आपल्या क्रिकेटमधील कारकिर्दीला सुरवात केली. वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ख्याती होती. अख्तरची कारकीर्द दुखापती, वाद आणि त्याच्या खराब वृत्तीने गाजली. सध्या तो सामन्यांमध्ये कॉमेंट्री करताना दिसून येतो. टीव्हीवरील कॉमेडी नाईट्स विथ कपिलकार्यक्रमात तो सहभागी देखील झाला होता.