सर्वाधिक चर्चेत असलेली अडल्ट स्टार म्हणून मिया खलिफाला ओळखलं जातं. सोशल मीडियावरही ती कायम सक्रिय असते. सध्या ती पॉर्न इंडस्ट्रीतून दूर आहे. तिची लोकप्रियता आजही कायम आहे. इतकंच नव्हे तर सोशल मीडियावर तिचे लाखोच्या घरात चाहते आहेत. तिच्या काही अ‍ॅडल्ट चित्रपटांची आजही चर्चा रंगताना दिसते. जुन्या अ‍ॅडल्ट चित्रपटामधील फोटो व व्हिडीओवर कमेंट करणाऱ्यांवर ती भडकली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Video : कॅमेऱ्यासमोरच अंकिता लोखंडेचा नवऱ्यासह बाथटबमध्ये रोमान्स, व्हिडीओही केला शेअर, नेटकरी म्हणाले, “लाज वाटत नाही का?”

मिया सोशल मीडियाद्वारे बरेच बोल्ड लूकमधील फोटो व व्हिडीओ शेअर करताना दिसते. यावर अनेकजण विचित्र कमेंट करतानाही दिसतात. शिवाय सोशल मीडियावर मियाला काहीजण तिच्या जुन्या अ‍ॅडल्ट चित्रपटांचे फोटो व व्हिडीओ सातत्याने शेअर करत आहेत. हा प्रकार पाहून मियाचा राग अनावर झाला.

सोशल मीडियाद्वारे व्यक्त होणाऱ्या मियाने आता एक ट्वीट केलं आहे. या ट्विटद्वारे तिने नेटकऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. अ‍ॅडल्ट फिल्ममध्ये मिया खलिफाला बघितलेल्या दर्शकांना उद्देशून ती म्हणाली की, “तुम्ही अगदी स्तनपानाची दृष्ये रंगवली असतील, पण म्हणून काय मी तुमची आई होत नाही.”

मियाच्या या ट्वीटनंतर अनेकांनी यावर विचित्र कमेंटही केल्या आहेत. मिया खलिफाने २०१४ मध्ये पॉर्न इंडस्ट्रीत प्रवेश केला. यानंतर मियाच्या कुटुंबीयांनी तिच्याशी संबंध तोडले. तीन महिन्यांमध्येच पॉर्न इंडस्ट्री सोडली असल्याचं मियाने २०१६मध्ये सांगितलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ex pornstar mia khalifa angry on netizens for sharing her adult photos and video says i am not your mummy see details kmd