प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचं निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते ६९ वर्षांचे होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. बप्पी लहरी यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. पॉप आणि रॉक म्युझिकची क्रेझ चाहत्यांच्या मनावर घर करून बसलेल्या बप्पी दाची ही बातमी ऐकून सगळ्यांचेच डोळे डोळे पाणावले आहेत. क्रिकेटर युवराज सिंग, आदित्य राज, हंसल मेहता यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांना गेल्या वर्षी त्यांनाही करोनाची लागण झाली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किती आहे सोने- चांदी?

बप्पी लाहिरी यांना सोन्याची किती आवड होती हे आपल्या सर्वांना माहीत आहे. ते त्यांच्या या खास शैलीसाठी ओळखले जायचे. त्यांना अमेरिकन रॉकस्टार एल्विस प्रेस्ली आवडत होता. त्या रॉकस्टारला अनेक प्रसंगी सोन्याची साखळी आणि सोन्याचा पोशाख घातलेला त्यांनी बघितला होत. त्याची ही अनोखी स्टाइल बप्पी लहरी यांना आवडली आणि त्यांनीही आपल्या स्टाइलमध्ये सोन्याचे कपडे घालायला सुरुवात केली. बप्पी लहरी यांना भारताचा गोल्ड मॅन देखील म्हटले जाते.

(हे ही वाचा: Bappi Lahiri: एका वर्षात ३३ चित्रपटांसाठी बनवली १८० गाणी; जाणून घ्या ‘डिस्को किंग’बद्दल या रंजक गोष्टी)

बप्पी दा सोन्याचे शौकीन तर बायकोला हिऱ्याची आवड

केवळ गायक बप्पी लाहिरीच नाही तर त्यांना राजकारणाचीही खूप आवड होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांच्या संपत्तीचा, सोने-चांदीचा तपशील समोर आला होता. सध्या जुन्या अहवालानुसार, त्यावेळी त्यांच्याकडे ७५२ ग्रॅम सोने आणि ४.६२ किलो चांदी होती फक्त बप्पी दाच नाही तर त्यांची पत्नी चित्रांशी देखील दागिन्यांची शौकीन आहे. २०१४ मध्ये त्यांच्याकडे ९६७ ग्रॅम सोने, ८.९ किलो चांदी आणि ४ लाखांहून अधिक हिरे होते. बप्पी लाहिरी मुंबईत २००१ मध्ये खरेदी केलेल्या आलिशान घरात राहत होते. त्यांच्या घराची किंमत सुमारे ३.५ कोटी रुपये आहे. त्याच्याकडे BMW, Audi, Tesla X आणि आणखी काही लक्झरी कार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exactly how much gold did the bappi lahiri have self disclosure of property ttg