भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील मनोरंजन उद्योगामध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी या हेतूने पहिल्यावहिल्या ‘साऊथ आफ्रिका इंडिया फिल्म अॅंड टेलीव्हिजन अॅवॉर्ड्स’ (साईफ्ता)चे आयोजन करण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्यात दरबान येथे होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन सैफ अली खान करणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिके तील मनोरंजन उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याची माहिती नुकतीच हॉटेल ‘ताज लँड’ येथे झालेल्या एका कार्यक्रमात देण्यात आली. या पुरस्कारांच्या निवड समितीत दोन्ही देशातील मान्यवरांचा परीक्षक म्हणून सहभाग असणार आहे. भारताकडून ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान, दिग्दर्शक मुकेश भट, अभिनेता बोमन इराणी, दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा आणि नृत्यदिग्दर्शिका फराह खान यांची परीक्षक समितीवर नेमणूक करण्यात आली आहे. तर दक्षिण आफ्रिकेच्या वतीने अभिनेता-लेखक वेलकम सोमी, टीव्ही कलाकार सायरा एसा, पीटर रोव्हरिक, लिंडा बुखोसिनी, कॅरोलिन स्मार्ट आणि अभिनेत्री लेलेती खुमालो हे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. ‘सेलिब्रिटी लॉकर’ या मुंबईस्थित इव्हेंट कंपनीने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन के ले असून ६ सप्टेंबरला दरबन येथे हा सोहळा होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा