बॉलीवूड क्वीन कंगना रणौत तिच्या पुढच्या चित्रपटाच्या तयारीत जुंपली आहे. विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘रंगून’ या चित्रपटात ती झळकणार आहे.
‘रंगून’साठी कंगना सध्या घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेतेयं. अभिनेता जीतू वर्मा (जोजो) तिला याचे प्रशिक्षण देत आहे. कंगनाला ‘रंगून’ चित्रपटासाठी घोडेस्वारी शिकायची होती. त्यासाठी मी तिला गेले दोन महिने प्रशिक्षण देतोय, असे जीतू म्हणाला. कंगनाही तितक्याच आवडीने आणि मेहनतीने घोडेस्वारी शिकत आहे. कंगना व्यतिरीक्त जीतूने शाहिद कपूर आणि आलिया भटला शानदार चित्रपटासाठी घोडेस्वारी शिकविली होती.
कंगना घेतेयं घोडेस्वारीचे धडे
बॉलीवूड क्वीन कंगना रणौत तिच्या पुढच्या चित्रपटाच्या तयारीत जुंपली आहे.
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 03-10-2015 at 12:42 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exclusive kangana ranaut starts preparing for rangoon learns horse riding