सच्चा नाटककार कोण जो तीन तास लोकांना खुर्चीला खिळवून ठेवतो तोच का? पण जो नाटक रंगण्याआधीपासून सेट लावण्यासाठी धडपडत असतो लाइट्स बरोबर लागल्या की नाही हे पाहणाराही सच्चा नाटककार असू शकतो ना? फक्त त्यांच्या चेहऱ्याला ओळख नसते एवढंच पण मेहनतही ते तेवढीच करतात. संपूर्ण नाटक ज्याच्या खांद्यावर असतं असा नाटकाचा निर्माताही सच्चा नाटककार आहेच की.. नेहमीच नवनवीन विषय घेऊन ते प्रेक्षकांचे मनोरंजन करायला येत असतात. कधी तर चाकोरी बाहेरचे विषयही मराठी रंगभूमीने अनेकदा बघितले आहेत काही पसंतीस पडले तर काहींना नकार मिळाला पण ते प्रेक्षकांसमोर आणण्याचं धाडस करणाऱ्या निर्मात्याला काय मिळतं याबद्दल सांगतोय, नाट्यनिर्माता राहुल भंडारे…

खरं तर नाटक हे माझ्यासाठी व्यक्त होण्याचं माध्यम आहे. इथे तुम्ही त्या सर्व गोष्टी सांगू शकतात ज्यांचा तुम्हाला राग येतो अर्थात त्याची एक पद्धतही आहे. समाज प्रबोधन करण्याचं सर्वात उत्तम माध्यम म्हणून मी रंगभूमीकडे बघतो. रंगभूमी कधीच कोणाला रिकामी ठेवत नाही ती काही ना काही शिकवते. जी नाटकं यशस्वी झाली त्यांनी मला शिकवलं आणि जी नाटकं फारशी चालली नाही त्यांनी मला अनुभव दिला. तोच अनुभव उराशी घेऊन आता माझं ‘स्टॅच्यु ऑफ लिबर्टी’ हे अजून एक नाटक येत आहे.

mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?
Accused who surrendered in Kalyaninagar accident case remanded in police custody Pune
कल्याणीनगर अपघात प्रकरणात शरण आलेल्या आरोपीला पोलीस कोठडी
Balu Dhanorkar mother, Vatsala Dhanorkar claim,
खळबळजनक! खासदार बाळू धानोरकरांचा घातपात, आईच्या दाव्याने शंका कुशंका
TET, AI, TET malpractices, TET news, TET latest news,
‘टीईटी’वर आता एआय ठेवणार नजर… गैरप्रकार रोखण्यासाठीच्या उपाययोजना काय?
abuse girl by delivery boy search for absconding accused is on
‘डिलिव्हरी बॉय’कडून मुलीशी अश्लील कृत्य; पसार झालेल्या आरोपीचा शोध सुरू

सध्या कोणती नावाजलेली व्यक्ती वारली तर तिचे पुतळे उभे केले जातात किंवा एखादं स्मारक बांधलं जातं. पण त्या माणसासाठीची आत्मियता मात्र कुठेच दिसून येत नाही. काही दिवसांनी डोळ्यांना सरावलेला तो पुतळाही दिसेनासा होतो. एकीकडे माणुसकी हरवत चालली असताना दुसरीकडे पुतळे उभारण्याचं प्रस्त वाढत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य पूर्णपणे गमावू की काय असा प्रश्न अनेकांना पडत आहे. पण नेमकी याच प्रश्नाचे उत्तर देणारे अद्वैत थिएटर्सच निर्मित ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ हे नाटक येत आहे. येत्या १० जूनला औरंगाबादला या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे.

औरंगाबाद येथील ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप घारे, जयंत शेवतेकर, प्रा. रमाकांत भालेराव यांच्या या नाटकात प्रमुख भूमिका आहेत. ‘ठष्ट’, ‘बॉम्बे १७’, ‘करुन गेलो गाव’, ‘जागो मोहन प्यारे’, ‘एकदा पाहावं न करून’ अशी एकाहून एक वेगळ्या विषयांची नाटकं रसिकप्रेक्षकांना देणारा निर्माता अशी राहुल १५ वी कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर करायला सज्ज झाला आहे.

एकीकडे पुतळ्यांची उंची वाढत असताना माणसांची मनं मात्र खुजी होत चालली आहेत, जातीपाती, धर्माच्या नावावर देशाचे तुकडे पडत असताना आपण मात्र काहीच करू शकत नाही हे असं कुठपर्यंत चालणार आपला आवाज कधी कोणी ऐकणार की नाही या विषयावर हे नाटक भाष्य करतं. प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप या नाटकाच्या माध्यमातून पहिल्यांदा दिग्दर्शन करत आहेत तर शाहीर संभाजी भगत यांनी या नाटकाला संगीत दिले आहे.

मला नेहमीच चाकोरी बाहेरच्या गोष्टी करायला आवडतात. मी आतापर्यंत निर्मिती केलेल्या नाटकांकडे बघितलं तर हे प्रकर्षाने जाणवेल. कोणतीही नवीन गोष्ट करायला हिंमतीची गरज असते. एकदा का तुमच्यात ती हिंमत आली की मग पुढे येणाऱ्या अनेक समस्यांना तुम्ही सहज तोंड देऊ शकतात. एकदा ‘शिवाजी अंडर ग्राऊंड इन भिमनगर मोहल्ला’ नाटकाच्या प्रयोगाला एका पक्षाचे सुमारे १०० कार्यकर्ते मला मारायला आले होते. नाटक संपल्यवर मला मारण्यासाठी त्यांनी खास पक्षाचे झेंडे लावलेल्या काठ्या आणल्या होत्या. त्या सर्वांनीच ते नाटक पाहिलं आणि नाटक संपल्यावर त्या काठ्यांवरचे झेंडे खाली उतरवले आणि त्या काठ्या मला भेट म्हणून दिल्या. जर भविष्यात माझ्यावर कोणी हल्ला केला तर संरक्षणासाठी म्हणून त्यांनी त्या काठ्या भेट म्हणून दिल्या. त्या कार्यकर्त्यांना तेवढाच शिवाजी समजला होता जेवढा त्यांच्या नेत्याने त्यांना दाखवला होता. पण शिवाजी अंडर ग्राऊंडमुळे अजून १०० माणसं या नाटकाशी जोडली गेली याचा मला आनंद आहे. हे फक्त रंगभूमीच करू शकते हे पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवलं.

शब्दांकन- मधुरा नेरूरकर
madhura.nerurkar@indianexpress.com