बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा यांच्या लग्नाच्या स्वागत समारंभाची निमंत्रण पत्रिका बॉलीवूड चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. मुंबईत १२ जुलै रोजी होणाऱया स्वागत समारंभाची पत्रिकाच इतकी आकर्षक आहे की, त्यावरून समारंभ देखील तितकाच शाही पद्धतीने होणार असल्याची प्रचिती येते. दिल्ली स्थित रविश कपूर यांनी शाहिदच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका डिझाईन केली होती. लग्नाच्या स्वागत समारंभाची निमंत्रण पत्रिका देखील त्यांनीच तयार केली आहे. निळ्या रंगाच्या मखमली पाकिटात सामावलेल्या छोटेखानी पत्रिकेचे डिझाईन आकर्षक आहे.
दोन खुर्च्यांवर बसलेल्या वर-वधूंना पाहुणे येऊन हस्तांदोलन करतील अशा पारंपारीक पद्धतीचा स्वागत समारंभ आयोजित करायचा नसल्याची कल्पना शाहिदने आधीच दिली होती, असे रविश कपूर यांनी सांगितले. पाहुणे मंडळी आनंद घेतील, पार्टी आणि सेलिब्रेशन करतील असा स्वागत समारंभ आयोजित करायचा असल्याने त्यानुसारच निमंत्रण पत्रिकेचे डिझाईन असावे, या शाहिदच्या इच्छेनुसार पत्रिका डिझाईन करण्यात आल्याचे रविश पुढे म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा