मनोरंजनाचा डबल डोस घेऊन ‘दे धक्का २’ चित्रपट अवघ्या दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरताना दिसत आहे. २००८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘दे धक्का’ चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम या त्रिकुटाने पहिल्या भागात केलेली हीच धमाल मस्ती प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. मनोरंजनाचा डबल डोस घेऊन ‘दे धक्का २’ चित्रपट शुक्रवारी (५ ऑगस्ट) प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने ‘दे धक्का २’ च्या टीमने ‘लोकसत्ता डिजीटल अड्डा’ला हजेरी लावली. यावेळी सर्व कलाकारांनी अभिनेते शिवाजी साटम यांच्या काही गोड आठवणी सांगितल्या. यावेळी महेश मांजरेकर यांच्या पत्नी अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी शिवाजी साटम यांची एक आठवण सांगितली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवाजी साटम यांनी मांजरेकर कुटुंबाला अडचणीच्या काळात कशाप्रकारे मदत केली, याबद्दलची एक भावूक आठवण शेअर केली आहे. त्यांची ही आठवण ऐकून सर्वजण भारावून गेले. हा किस्सा सांगताना मेधा मांजरेकरही भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मेधा मांजरेकर म्हणाल्या, “आमच्या आयुष्यातील तो अतिशय वाईट आणि खडतर काळ होता. त्यावेळी महेशचे ऑफिस त्याच्या घरीच होते. तो तिथे बसला होता. त्यावेळी शिवाजी साटम यांचा मुलगा म्हणजे अभिजीत साटम हा अचानक तिथे आला.”

Exclusive : ‘मी शूटींग बंद करतोय…’ म्हणत सिद्धार्थ जाधववर संतापले महेश मांजरेकर, वाचा नेमकं काय घडलं?

“त्याने समोर असलेल्या टेबलावर एक पाकिट ठेवले आणि तो निघून गेला. काही वेळाने आम्ही ते पाकिट बघितले तर त्या पाकिटात काही पैसे होते. आम्ही कधीही शिवाजी साटम यांना पैशांबाबत विचारणा केली नव्हती. त्यांच्याकडे मागितलेही नव्हते. पण जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांनी न विचारता न मागता ते पैसे दिले होते. असा आमचा शिवाजी…”, असे मेधा मांजरेकर यांनी सांगितले.

Exclusive Video : ‘बिग बॉस मराठी’चे सूत्रसंचालन करणार आहेस का? सिद्धार्थ जाधव म्हणाला, “माझा विचार…”

दरम्यान या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी केलं आहे. तसेच अमेय खोपकर यांच्या बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. दे धक्का २ हा चित्रपट ५ ऑगस्टपासून संपूर्ण चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.