मराठी कलाविश्वात हरहुन्नरी कलावंताची कमी नाही, यातीलच एक नाव म्हणजे अभिनेते संजय मोने. खुमासदार लेखणीने जितके ते प्रसिद्ध, तितकेच अभिनेते म्हणून देखील श्रेष्ठ आहेत. नाटक, मालिका, चित्रपट अशा माध्यमांमधून ते कायमच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. किस्से सांगणे यात त्यांचा हातखंडा आहे. यासाठी ते कलाविश्वात प्रसिद्ध देखील आहेत. असाच एक त्यांच्या सोबत घडलेला किस्सा आपण जाणून घेणार आहोत.

अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये संजय मोने यांनी त्यांच्या मित्राचा किस्सा सांगितला आहे. मुलाखतीत ते असं म्हणाले की, एका नाटकाच्या प्रयोगासाठी ते रेल्वेने जाणार होते तेव्हा वाटेत जळगाव स्टेशन लागणार होते. जळगावच्या एका प्रसिद्ध हॉटेलमधले चिकन खाण्याची त्यांची इच्छा झाली म्हणून त्यांनी आपल्या जळगावमधील मित्राला कळवले की, स्टेशनवर आम्हाला त्या हॉटेलमधील चिकन आणून दे, मित्रांना आणतो असे कबुल देखील केले.

केके ‘या’ प्रसिद्ध गायकाचा होता चाहता, कारकिर्दीच्या सुरुवातीला होता मोठा प्रभाव

प्रयोगाला जाण्यासाठी मोने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबईवरून गाडी पकडली, मात्र मोनेंना स्टेशनवर कळले की गाडी जळगावला थांबत नाही. त्यांनी ताबडतोप आपल्या जळगावच्या मित्राला हा बेत रद्द करण्यास सांगितले. मात्र मित्र म्हणाला काळजी करू नकोस तुला चिकन मिळण्याची जबाबदारी माझी. मोने चिंतेत होते कारण त्यांनी चिकन मिळणार म्हणून रेल्वेत जेवणाची ऑर्डर दिली नाही. मोने पुढे म्हणाले की, सोबतच्या सहकाऱ्यांमध्ये देखील धास्ती होती पण अखेर भुसावळ स्टेशन आले आणि तो मित्र देखील त्यांच्या डब्याच्या बाहेर चिकन घेऊन थांबला होता.

मोने आणि त्यांचे सहकारी चकित झाले, मित्राने सर्वाना सांगितले’ रेल्वे कॅन्टीनला तुम्ही जेवून घ्या, गाडी मी तुमच्यासाठी थांबवतो’. मोने आणि त्यांचे सहकारी त्या कॅन्टीनमध्ये जेवले आणि एक्सप्रेस गाडी तब्बल १५ ते २० मिनिटे त्या मित्राने मोनेंसाठी थांबवली. मोने यांनी पुढे सांगितले की ‘तो मित्र जळगाववरून गाडीवर चिकन घेऊन आला होता’.

वरील किस्सा ऐकल्यावर अभिनेत्री सुलेखा तळवलकर देखील थक्क झाल्या. मोनेंनी मुलाखतीत आपल्या खाजगी आयुष्याबद्दल, नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी अशा अनेक विषयांवर मनसोक्त गप्पा मारल्या. संजय मोने यांचे सर्वात गाजलेले नाटक म्हणजे ‘कुसुम मनोहर लेले’ या नाटकात यांच्याबरोबरीने गिरीश ओक आणि सुकन्या मोने प्रमुख भूमिकेत दिसले होते. ‘कानाला खडा’ नावाचा कार्यक्रम देखील संजय मोने करत होते.

Story img Loader