बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या कमालीची व्यस्त आहे. एका चित्रपटाचे शुटिंग आणि प्रमोशन संपत नाही तो तिच्या दुसऱ्या चित्रपटाचे शुटिंग सुरू होण्याची वेळ येते. अशामुळे कोणत्या चित्रपटाला वेळ द्यावा आणि देऊ नये ही समस्या तिच्यासमोर उभी राहते. हल्ली दीपिका ‘हॅपी न्यू इयर’ या तिच्या चित्रपटाचे प्रमोशन करताना नजरेस पडते. हा चित्रपट प्रदर्शित होताच दीपिका आपल्या आगामी चित्रपटास सुरुवात करेल. यामुळे संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’ या महत्वाकांक्षी चित्रपटासाठी दीपिकाकडे अजिबात वेळ नाही. या चित्रपटात दीपिकाशिवाय रणवीर सिंग आणि प्रियांका चोप्रा यांच्यादेखील भूमिका आहेत. दीपिकाच्या झोळीत ‘पीकू’ आणि ‘तमाशा’सारखे मोठे चित्रपटदेखील असून, हे दोन चित्रपट पूर्ण झाल्यावरच ती संजय लीला भन्साळींचा ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपट पूर्ण करू शकेल.

Story img Loader