दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जीचा ‘डिटेक्टिव्ह व्योमकेश बॅनर्जी’ या चित्रपटाचे चित्रीकरण येत्या आठवड्यात पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका दिसणार आहे. आतापर्यंत या चित्रपटातील पात्रांच्या दिसण्याबाबत आणि एकुणच चित्रपटाविषयी मोठ्या प्रमाणावर गुप्तता बाळगण्यात आली आहे. कोलकाता शहरात या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण झाले असून गेल्या चार दिवसांत कोलकत्यात या चित्रपटातील अनेक महत्वपूर्ण प्रसंग चित्रीत करण्यात आले. या संपूर्ण चित्रीकरणादरम्यान स्थानिक प्रसारमाध्यमे आणि पर्यटकांना छायचित्रे काढण्यापासून मज्जाव करण्यात आला होता. ‘डिटेक्टिव्ह व्योमकेश बॅनर्जी’ चित्रपटाची कथा दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील असल्यामुळे १९४०सालचा काळ तंतोतंत उभा करण्यासाठी व्हीएफएक्स तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या धुम-३ या चित्रपटातसुद्धा ज्या पद्धतीने  व्हीएफक्सचा चाकोरीबाह्य रितीने वापर करण्यात आला होता, तशाचप्रकारे ‘डिटेक्टिव्ह व्योमकेश बॅनर्जी’ मध्ये व्हीएफक्सच तंत्रत्रानाचा वापर करण्यात आल्याची चर्चा आहे. या चित्रपटातील तांत्रिक भाग लक्षात घेता, चित्रीकरण पूर्ण होऊनसुद्धा प्रेक्षकांना पुढील वर्षीच्या १३ एप्रिलपर्यंत या चित्रपटासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

Story img Loader