भारतात बहुतांश गो-या रंगाची व्यक्ती म्हणजे सुंदर दिसणारी व्यक्ती समजली जाते. गोरा रंग जणू ही सौंदर्याची परिभाषाचं आहे, असे काही लोकांना वाटते. पण सावळा रंग असलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीला गोरेपणा म्हणजे सुंदरता असे वाटत नाही. नवाजुद्दीन हा मयुर सुटींग्सचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर झाला आहे. याच पत्रकार परिषदेत तो बोलत होता.
फेअरनेस क्रीमची प्रसिद्ध करणार का, असा प्रश्न नवाजुद्दीनला केला असता तो म्हणाला की, गोरेपणा? नाही नाही. गोरेपणासाठी असलेल्या क्रीमची प्रसिद्धी करण्याची माझी इच्छा नाही. तुम्हाला सुंदर दिसण्यासाठी कोणत्याही प्रॉडक्टची गरज नाही. सुंदरता ही आपल्यात असते. सुंदर दिसण्यासाठी तुम्हाला गोरं असण्याची गरज आहे, अशी कोणावरचं सक्ती करण्यात आलेली नाही. मुळात आधीपासून चालत आलेली ही संकल्पनाच अर्थहीन आहे. फेअरनेस क्रीमच्या प्रसिद्धी नाकारताना नवाजुद्दीनने कंगना रणौत, अनुष्का शर्मा आणि रिचा चड्डा या अभिनेत्रींची उदाहरणे दिली. या तिघींनीदेखील फेअरनेस क्रीमच्या जाहिराती नाकारल्या आहेत.
गोरेपणा ही सौंदर्याची व्याख्या नाही- नवाजुद्दीन सिद्दीकी
तुम्हाला सुंदर दिसण्यासाठी कोणत्याही प्रॉडक्टची गरज नाही. सुंदरता ही आपल्यात असते.
Written by चैताली गुरवguravchaitali
First published on: 09-10-2015 at 12:32 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fairness inessential to look beautiful nawazuddin siddiqui