अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेत्री फैय्याज यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. पुढील वर्षी ३०, ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी या कालावधीत ९५ वे नाटय़ संमेलन बेळगाव येथे होणार आहे.
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळ सदस्यांच्या रविवारी मुंबईत दादर येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचेअध्यक्ष मोहन जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नाटय़ संमेलनाचे स्थळ आणि नाटय़ संमेलनाध्यक्षाची निवड करण्यात आली
बेळगावसह कोल्हापूर, जळगाव, अहमदनगर, उस्मानाबाद, सातारा, नाशिक या शाखांकडून नाटय़ संमेलन भरविण्यासाठीची निमंत्रणे नाटय़ परिषदेकडे आली होती. यातून ९५ व्या नाटय़ संमेलनासाठी बेळगावची निवड करण्यात आली तसेच फैय्याज यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
दरम्यान नाटय़ संमेलनाध्यक्षपदासाठी फैय्याज यांच्यासह मुरलीधर खैरनार यांचा अर्ज दाखल झाला होता. नियामक मंडळ सदस्यांची दादर येथील यशवंत नाटय़ संकुलातील नाटय़ परिषदेच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Story img Loader