नवनवीन उपक्रम…कल्पक युक्त्या…आकर्षक बक्षिसांची लयलूट…उद्देश मात्र एकच… प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन!. आताही अशीच एक संकल्पना घेऊन ‘झी टॉकीज’ वाहिनी प्रेक्षकांना आकर्षक कार, बाईक किंवा स्कुटर जिंकण्यांची संधी देत आहेत ज्याचे नाव आहे ‘फॅमिली कार महास्पर्धा’. या महास्पर्धे अंतर्गत १ ते ३१ मार्चपर्यंत ‘झी टॉकीज’ वर विचारल्या जाणा-या प्रश्नांची अचूक उत्तरं देणारे स्पर्धेक वरील बक्षिसासांठी पात्र ठरतील.
मार्च महिन्यातील दर शनिवार आणि रविवार, सकाळी ११.३० ते रात्री १२.०० या वेळेत ‘झी टॉकीज’ वाहिनीवरील कार्यक्रमांदरम्यान विचारल्या जाण्या-या प्रश्नांची उत्तरं नोंदविण्यासाठी दिलेल्या पर्यायासमोरील नंबरवर प्रेक्षकांना फक्त फ्री मिस्ड कॉल द्यायचा आहे. प्रत्येक तासाला एक याप्रमाणे १२ प्रश्नं विचारले जाणार असून प्रत्येक आठवड्याला एक विजेत्या स्पर्धकाच नाव सोमवारी अथवा मंगळवारी वाहिनीवर घॊषित करण्यात येईल. त्या विजेत्याला ‘बाईल/स्कुटर’ जिंकण्याची संधी मिळेल. तर या पाच आठवड्यात महास्पर्धेतून निवडलेल्या एका लकी स्पर्धकाला आकर्षक ‘फॅमिली कार’ जिंकण्याची संधी मिळणार आहे.
‘फॅमिली कार महास्पर्धा’ या ‘झी टॉकीज’ वाहिनीच्या संकल्पनेतून स्वत:ची गाडी घेण्याचं तुमच स्वप्नं पूर्ण करू शकता तेही केवळ एका फ्री मिस्ड कॉलव्दारा. प्रेक्षकांच्या स्वप्नांना ‘झी टॉकीज’ च्या ‘फॅमिली कार महस्पर्धेने’ एक अनोखी संधी मिळवून दिली आहे.

Story img Loader