Leah Remini announces divorce from Angelo Pagan : हॉलीवूड गायिका व अभिनेत्री जेनिफर लोपेझ हिने नुकतीच घटस्फोटाची घोषणा केली. त्यानंतर आता तिची जवळची मैत्रीण व प्रसिद्ध अभिनेत्री लिया रेमिनी हिने पतीपासून विभक्त होत असल्याची माहिती दिली आहे. लिया हिचा २१ वर्षांचा संसार मोडला आहे. ती अभिनेता अँजेलो पॅगनपासून घटस्फोट घेत आहे. दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट करून घटस्फोटाची घोषणा केली आहे.
सप्टेंबर महिन्यात OTT वर येणार ‘हे’ चित्रपट अन् सीरिज; वाचा संपूर्ण यादी
‘पिपल पझलर’ फेम ५४ वर्षीय लिया रेमिनी व अँजेलो दोघेही २८ वर्षांपासून एकत्र होते. त्यांच्या लग्नाला २१ वर्षे झाली आहेत. जवळपास २८ वर्षे एकत्र घालवल्यानंतर या जोडप्याने घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. या जोडप्याला सोफिया नावाची २० वर्षांची मुलगी आहे. घटस्फोटानंतरही मित्र राहू असं त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे.
सेटवरचं प्रेम, वयात १४ वर्षांचे अंतर अन् कडाक्याची भांडणं; अभिनेता म्हणाला, “एका क्षणी मला वाटलं…”
“२८ वर्षे एकत्र राहिल्यानंतर आणि २१ वर्षांच्या संसारानंतर, आम्ही घटस्फोटासाठी अर्ज करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय खूप विचार करून घेतला आहे. घटस्फोट आमच्यासाठी खूप कठीण आहे, पण आम्ही त्याकडे सकारात्मकतेने पाहत आहेत, कारण आमच्यासाठी हा निर्णय किती चांगला आहे, ते आम्हाला ठाऊक आहे. होय, आम्ही दु:खी आहोत. आम्ही यापुढे काही गोष्टींमध्ये आम्ही वेगळे असू तर काही बाबतीत एकत्र असू,” असं लियाने लिहिलं.
पुढे तिने लिहिलं, “पण एक गोष्ट आहे, आम्ही बऱ्याच वर्षांपासून चांगले मित्र आहोत. आम्ही घटस्फोटानंतरही सुट्टी एकत्र घालवू. आमचे आवडते टीव्ही शो एकत्र पाहू आणि एक कुटुंब म्हणून एकत्र राहू.”
घटस्फोटाचे कारण काय?
इतकी वर्षे एकत्र राहिल्यानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय का घेतला याचं कारणही तिने पोस्टमध्ये सांगितलं. “सगळे लोक बदलतात, त्याच प्रमाणे आम्ही दोघेही खूप बदललो. आम्हाला अशा गोष्टी करण्याची सवय लागली ज्यात आम्ही आता फिट बसत नाही. खूप प्रयत्न आणि विचार केल्यानंतर आम्ही घटस्फोटाचा निर्णय घेतला. आमचा बाँड मजबूत आहे, पण आम्ही खूप बदललो आहोत,” असं लियाने लिहिलं.
लिया रेमिनी आणि अँजेलो पॅगन १९९६ मध्ये पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. दोघांची भेट क्युबामध्ये झाली होती. या जोडप्याने २००३ मध्ये लग्न केले आणि नंतर वर्षभराने त्यांना सोफिया नावाची मुलगी झाली. अँजेलोच्या याआधीच्या लग्नापासून त्याला तीन अपत्ये आहेत.