सुप्रसिद्ध तमिळ अभिनेत्री वनिता विजयकुमार चौथ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे. मंगळवारी ४३ वर्षीय वनिताने सोशल मीडियावर तिच्या चौथ्या लग्नाची घोषणा केली. दिग्गज तमिळ अभिनेते विजयकुमार आणि मंजुला यांची मुलगी वनिता प्रसिद्ध कोरिओग्राफर रॉबर्टशी लवकरच लग्न करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वनिताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर रॉबर्टबरोबरचा बीचवरील एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये वनिता रॉबर्टला प्रपोज करण्यासाठी गुडघ्यावर बसली आहे. “तारीख सेव्हा करा. ५ ऑक्टोबर २०२४. वनिता विजयकुमार वेड्स रॉबर्ट.” असं त्यावर तिने लिहिलं आहे.

एक्स बॉयफ्रेंडचे फोटो जाळले, बॉलीवूड अभिनेत्रीने ब्रेकअपनंतर ‘असा’ काढला राग

वनिताची तीन लग्नं

वनिताचे हे चौथे लग्न आहे. तिच्या व रॉबर्टच्या अफेअरच्या चर्चा मागच्या काही वर्षांपासून होत होत्या. वनिताने पहिलं लग्न २००० मध्ये अभिनेता आकाशशी केलं होतं. त्या लग्नापासून वनिताला दोन अपत्ये आहेत. पाच वर्षांनी २००५ मध्ये ते विभक्त झाले होते. पहिल्या घटस्फोटानंतर दोन वर्षांनी २००७ मध्ये दिने बिझनेसमन राजन आनंदशी लग्न केलं, हे लग्नही पाच वर्षांनी २०१२ मध्ये मोडलं. २०२० मध्ये वनिताने फोटोग्राफर पीटर पॉलशी लग्न केलं. पीटर विवाहित होता, त्याला दोन अपत्ये होती. पीटरने कायदेशीररित्या घटस्फोट न देता वनिताशी लग्न केल्याचा दावा त्याच्या पहिल्या पत्नीने केला होता. वनिता व पीटरचं लग्न वर्षभरही टिकलं नाही. दोघे २०२० मध्येच विभक्त झाले.

वनिताची इन्स्टाग्राम स्टोरी

वनिता विजयकुमारची स्टोरी (फोटो – इन्स्टाग्राम)

वनिताचा तिसरा घटस्फोट झाल्यानंतर काही काळांनी ती व रॉबर्ट डेटिंग करत आहेत, अशा बातम्या येऊ लागल्या. दोघांनी आधीच लग्न केल्याचीही अफवा होती. पण तिने एका स्टेटमेंटमध्ये लग्न केलं नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. “मी स्पष्ट करू इच्छिते की आम्ही अजून लग्न केलेलं नाही. आम्ही चांगले मित्र आहोत आणि आमच्या दोन्ही कुटुंबांना आमच्या मैत्रीबद्दल माहिती आहे. आम्ही दोघे मिळून एक प्रॉडक्शन हाऊस सुरू करण्याचा विचार करत आहोत. आमचे लग्न ठरले आहे, पण वेळ आल्यावर आम्ही स्वतः तुम्हाला त्याबाबत कळवू,” असं वनिता म्हणाली होती.

“घरातून प्रेतयात्रा चालल्यासारखं…”, अरबाज जाताना निक्कीच्या वागण्यावर पंढरीनाथ कांबळेचे परखड वक्तव्य

रॉबर्टने यापूर्वी एकदा वनिताबरोबर रिलेशनशिपमध्ये नाही, असं म्हटलं होतं. पण आता त्यांनीच लग्नाची घोषणा केली आहे. ते दोन दिवसांनी ते लग्न करणार आहेत.