जस्टिस हेमा कमिटीच्या रिपोर्टमुळे मल्याळम सिनेसृष्टीतील अत्याचाराच्या घटना उघडकीस येत आहेत. अनेक आघाडीचे अभिनेते आणि दिग्दर्शकांवर महिला कलाकारांनी आरोप केले आहेत. अशातच आता बंगाली सिनेसृष्टीतही एका प्रसिद्ध अभिनेत्रीने दिग्दर्शक अरिंदम सिलवर (Arindam Sil) गंभीर आरोप केले आहेत. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान संमतीशिवाय सर्वांसमोर किस केलं, असं तिने म्हटलं आहे. आता तिने याविरोधात कायदेशीर मदत घ्यायचं ठरवलं आहे.

वेस्ट बेंगाल कमिशन ऑफ वूमनच्या अध्यक्षा लीना गंगोपाध्याय म्हणाल्या की अभिनेत्रीने आता अरिंदमने लेखी माफी मागावी अशी मागणी केली आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना अरिंदम सिल म्हणाला, “मी सध्या याबाबत फार बोलणार नाही, पण माझ्याकडून अनावधानाने केलेल्या कोणत्याही कृत्याबद्दल तिला वाईट वाटलं असेल तर मी माफी मागतो. मी यासंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला घेत आहे. इतरांना जे बोलायचं बोलायचं आहे त्यांनी बोलावं, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे.”

आमिर खानच्या सावत्र भावाशी पळून जाऊन केलं लग्न, ५ वर्षांत मोडला आंतरधर्मीय प्रेमविवाह; अभिनेत्री म्हणाली, “खूपच वाईट…”

नेमकं काय घडलं?

३ एप्रिल रोजी एका रिसॉर्टमध्ये ‘एकटी खुनीर संधाने मितीन’ नावाच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते, तिथे ही घटना घडली होती. अभिनेत्री म्हणाली, “त्याने सर्वात आधी मला मांडीवर बसायला सांगितलं, मी नकार दिला. पण नंतर त्याने मला आदेश देत असल्याप्रमाणे ‘मी सांगतोय की बस’ असं म्हटलं. तो असं बोलला की मला नकार कसा देऊ तेच सुचत नव्हतं. त्यानंतर मी बसले आणि त्याने मला गालावर किस केलं. मी घाबरले होते आणि मला काहीच सुचत नव्हतं. मग मी तिथून हळूच निघून गेले. तो असा वागत होता जणू काही घडलंच नाही. तिथे उपस्थित बाकीचे लोक हसत होते, जणू त्याने विनोद केलाय. मी याबद्दल दिग्दर्शकाला सांगितलं तर तो मॉनिटरजवळ गेला आणि म्हणाला, तुला आवडलं नाही का?” असा प्रश्न केला.”

निक्कीशी जवळीक असलेल्या अरबाज पटेलच्या गर्लफ्रेंडने घेतला मोठा निर्णय, नेटकरी म्हणाले, “तू कोणत्या त्रासातून…”

“ही घटना घडल्यानंतर अरिंदमने लेखी माफी मागितली होती, त्यानंतरही त्याने चुकून किस केलं असं म्हणणं वाईट आहे. माझी माफी मागून एखादा जर इतकं बोलत असेल तर आता मला कायदेशीर सल्ला घ्यावा लागेल,” असं अभिनेत्री म्हणाली.

“अशी घटना पुन्हा घडणार नाही, असे आश्वासन मला प्रॉडक्शन हाऊसने दिले. तसेच माझ्या सुरक्षेसाठी मी जिथे थांबेन तिथे प्रॉडक्शन हाऊसमधी कोणीतरी थांबेल असं मला सांगण्यात आलं. चित्रपटाचं शूटिंग पुढे करायचं की नाही याचा निर्णय त्यांनी मला घ्यायला सांगितला. त्यांनी आश्वासन दिल्याने मी शूटिंग केलं. पण हा माझ्यासाठी भयंकर अनुभव होता. मात्र मी काम थांबवलं नाही कारण मी काम केलं नसतं तर त्याचा चित्रपटाशी संबंधित अनेकांवर परिणाम झाला असता,” असं अभिनेत्री म्हणाली.

“अभिनेत्रींचे नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करतात,” ज्येष्ठ अभिनेत्रीचा मोठा दावा; म्हणाल्या, “माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये…”

अभिनेत्रीने यासंदर्भात जुलै महिन्यात डब्ल्यूबीसीडब्ल्यूकडे तक्रार केली होती. याप्रकरणी २१ जुलै रोजी प्राथमिक सुनावणी पार पडली. यानंतर डायरेक्टर्स असोसिएशन ऑफ ईस्टर्न इंडियाने (DAEI) अरिंदम सिलला निलंबित केलं. हे सगळं झाल्यावर आता या प्रकरणावर बोलायची हिंमत झाली असं अभिनेत्री म्हणाली.

DAEI चे अध्यक्ष सुब्रत सेन यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, अरिंदम सिलला निलंबित केलं आहे पण तो चित्रपटाचे दिग्दर्शन करू शकतो.