दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध कन्नड चित्रपट दिग्दर्शक गुरुप्रसाद रविवारी (३ नोव्हेंबर) सकाळी बंगळुरू येथील त्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला. ‘एडेलू मंजुनाथ’ आणि ‘डायरेक्टर्स स्पेशल’ सारख्या चित्रपटांचा दिग्दर्शक गुरुप्रसाद ५२ वर्षांचा होता. त्याने दोन-तीन दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.
गुरुप्रसाद मागील आठ महिन्यांपासून उत्तर बंगळुरूमधील मदननायकनहल्ली भागातील एका अपार्टमेंटमध्ये राहत होता. शेजाऱ्यांना त्याच्या फ्लॅटमधून दुर्गंधी आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं समजलं. इंडियन एक्सप्रेसने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुप्रसादचे आर्थिक नुकसान झाले होते, त्याने लोकांकडून उसने पैसे घेतले होते. त्याचा नुकताच आलेला ‘रंगनायक’ चित्रपट फ्लॉप ठरला आणि त्यामुळे तो नैराश्यात होता.
हेही वाचा – सूरज चव्हाणचे ट्रेडिंग गाण्यावर रील पाहून युजर म्हणाला, “भाऊ, तू असे व्हिडीओ नको बनवत जाऊस…”
आर्थिक संकटात होता गुरुप्रसाद
फायनान्शिअल एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुप्रसादने आत्महत्या केल्याचा संशय आहे. त्याच्या शेजाऱ्यांनी अपार्टमेंटमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार केल्यावर पोलीस तिथे पोहोचले. पोलिसांना त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला.
एसपी सीके बावा यांनी गुरुप्रसादच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजाऱ्यांनी गुरुप्रसादला पाच ते सहा दिवसांपूर्वी शेवटचं पाहिलं होतं. त्याच दिवसांमध्ये त्याने गळफास घेतल्याचं दिसतंय. तो आर्थिक संकटात होता, त्यामुळेच त्याने आत्महत्या केली. आम्ही त्याच्या मृत्यूची वेळ आणि बाकी तपास करत आहोत, असंही ते म्हणाले.
गुरुप्रसादच्या निधनाने वृत्त आल्यावर कन्नड कलाकार व चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ही बातमी ऐकून त्याच्याबरोबर काम करणाऱ्या स्टार्सनी श्रद्धांजली वाहिली आहे.
गुरुप्रसादचे चित्रपट
गुरुप्रसाद हे कन्नड चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव होते. २००६ मध्ये ‘माता’ चित्रपटातून त्याने दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं होतं. यानंतर ‘एडेलू मंजुनाथ’ हा त्याचा दुसरा चित्रपट होता. दोन्ही चित्रपट लोकांना खूप आवडले आणि ते हिट ठरले होते. इतकंच नाही तर या सिनेमांसाठी त्याला अनेक पुरस्कारही मिळाले.
हेही वाचा – दोन प्रेमविवाह, दोन्ही वेळा घटस्फोट; आता अभिनेत्रीने खरेदी केलं आलिशान घर, दिवाळीनिमित्त दाखवली घराची झलक
गुरुप्रसाद रिॲलिटी टीव्ही शो ‘डान्स कर्नाटक डान्स’चा परिक्षक होता. त्याने ‘बिग बॉस कन्नड २’ मध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. सध्या तो त्याचा आगामी ‘एडेमा’ या चित्रपटाचे शूटिंग करत होता, मात्र शूटिंग पूर्ण होण्याआधीच त्याच्या निधनाची बातमी समोर आली आहे.