गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रिल व्हिडीओ करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. विविध विषयांवर रिल व्हिडीओ करत स्टार झालेली ही मंडळी घराघरात पोहोचली आहेत. सोशल मीडियावर रिल स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनाली गुरवबरोबर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. आपला चेहरा मॉर्फ करून सोशल मीडियावर एक अश्लील व्हिडीओ व्हायरल होत असल्याची तक्रार तिने पोलिसात दाखल केली आहे.

सोनाली गुरव ही इन्स्टाग्रामवर चांगलीच सक्रीय असते. नुकतंच तिने या घडलेल्या प्रकाराबद्दल पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने काही लोकांना जाबही विचारला आहे. तसेच तिने पोलिसात जाण्याचे धाडस दाखवल्याबद्दलही भाष्य केले आहे. तसेच तिने केलेल्या तक्रारीचा फोटोही तिने यात शेअर केला आहे.
आणखी वाचा : Video : मनसेच्या नव्या पक्षगीतावर थिरकली प्राजक्ता माळी, नेटकरी म्हणाले “गाण्यावर नाचून…”

Offensive video viral of female police sub inspector Nagpur news
महिला पोलीस उपनिरीक्षकाचा आक्षेपार्ह ‘व्हिडिओ व्हायरल’
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Naseeruddin Shah criticized rajesh Khanna Twinkle Khanna Defends Her father
“तुम्ही खूप खालचा स्तर…,” नसीरुद्दीन शाह यांनी दिवंगत वडिलांचा अपमान केल्यावर भडकलेली ट्विंकल खन्ना
Arvind Kejriwal
Attack On Arvind Kejriwal : दिल्लीतल्या पदयात्रेत अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, आपचा भाजपावर गंभीर आरोप
Zeenat Aman And Raj Kapoor
राज कपूर यांनी ‘सत्यम शिवम सुंदरम’ सिनेमात घ्यावं यासाठी झीनत अमान यांनी लढवली होती युक्ती; म्हणाल्या, “मी डिंकाने माझ्या चेहऱ्यावर…”
young boy dance obscenely in front of mother
बापरे! आईसमोर अश्लील डान्स करणं पडलं महागात; गावासमोर दिला बेदम चोप, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “याची मस्ती…”
Woman obscene dance video viral on social media is from Madhya Pradesh where police officer and Councilor did obscene act
“टिप टिप बरसा पानी…”, महिलेचा अश्लील डान्स पाहून पोलिसांनी ओतलं अंगावर पाणी तर नगरसेवकाने… VIDEO एकदा पाहाच
school girls sexually assaulted
पिंपरी: दोन अल्पवयीन विद्यार्थिनींशी शाळेतील कर्मचाऱ्याचे अश्लील चाळे, महापालिकेने खासगी संस्थेला चालवण्यास दिलेल्या शाळेतील धक्कादायक प्रकार

सोनाली गुरवची पोस्ट

“काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे. एखाद्या मुलीला ज्या गोष्टीचा नुसता विचारच असह्य होईल, नेमकी ती घटना माझ्या आयुष्यात घडली. काही मित्रांचा फोन आला कि एक अश्लील मॉर्फ विडीओ सध्या वायरल होतोय. पायाखालची जमीन सरकली. पटकन सगळं सोडून कुठेतरी निघुन जावसं वाटलं. वाईट वाईट विचार येऊ लागले. हि घटना झाल्यापासून सतत माझ्या आई वडिलांचा चेहरा माझ्या समोर यायचा. कौतुकाने बघणाऱ्या नजरा हिणवू लागल्या.

सगळं काही छान सुरु असताना एखाद वादळ येऊन सगळं उध्वस्त करून जातं. अगदी तसच वाटलं. आणि सगळ्यात जास्त वाईट तेव्हा वाटलं जेव्हा मला अश्लील मेसेज, इमेल्स आणि कमेंट्स येऊ लागल्या. लोकांना चर्चेला, मजा मारायला नवीन विषय मिळाला. खरंच एवढा वेळ आहे लोकांकडे? हि वेळ आपल्या घरच्या मुलीवरही येऊ शकते आणि मग तेव्हा आपण असेच react करणार आहोत का? याची जाणीव कशी नाही होत.

काही दिवस घाबरत कसेबसे दिवस ढकलू लागले पण नंतर घरच्यांनी आणि मित्र-मैत्रिणीनी मानसिक बळ दिलं. आणि मी पोलीस स्टेशन गाठलं. कोर्टाची आणि पोलीस स्टेशनची पायरी कधीच चढू नये असं मला नेहमी वाटत. पण त्याउलट पोलिसात गेल्या गेल्या पोलिसांनी मला सहकार्य केलं आणि लगेच हालचाली सुरु झाल्या. पोलीस झपाट्याने हे कृत्य करणाऱ्याना आणि ते पसरवायला मदत करणाऱ्या लोकांवर कारवाई करत आहेत. मला पोलीस आणि आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे.

फक्त खंत हीच आहे. कि आपला समाज एवढा विकृत कसा काय झाला? कुठून येते हि विकृती. १६-१७ वयाची लहान लहान पोरं देखील अश्लील केमेंट मेसेज करतात तेव्हा चीड येते. स्वतःच्याच समाजात वावरण्याची भीती वाटते. पण आता ठरवलं आहे मी जशी हि घटना झाल्यानंतरही माझ्या चाहत्यांचं, हितचिंतकांचं मनोरंजन करणं थांबवलं नाही त्यापेक्षा दुपटीने मेहनत करून तुमचं मनोरंजन करायचा प्रयत्न करत राहीन. लवकरच अश्लीलता नसलेल्या, जज न करणाऱ्या समाजात मी आणि माझ्यासारख्या अनेक मुली बागडतील हीच स्वामींचरणी प्रार्थना”, अशी पोस्ट सोनालीने केली आहे.

आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकार २५ वर्षांपूर्वी कसे दिसायचे? फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

दरम्यान सोनालीच्या या पोस्टवर तिचे अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहे. अभिनेता अभिनय बेर्डे यानेही तिच्या पोस्टवर कमेंट केली आहे. त्याने यावर ‘तुला देव बळ देवो’, असे म्हटले आहे. तर काहींनी तिने उचललेल्या धाडसी पावलाचे कौतुक केले आहे.