सोशल मीडियाद्वारे घराघरात पोहोचलेली रिल स्टार म्हणून सोनाली गुरवला ओळखले जाते. सोनालीचा चेहरा मॉर्फ करून सोशल मीडियावर एक अश्लील व्हिडीओ व्हायरल होत असल्याच्या प्रकरणामुळे ती चर्चेत आली आहे. या प्रकरणी तिने पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता सोनालीने पोस्ट करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

JNU plans Shivaji centre
छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमीकावा अन् मराठा लष्करी इतिहास, JNU मध्ये आता विशेष केंद्र; कधी सुरू होणार अभ्यासक्रम
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Narendra Modi Wears Muslim Skull Cap During Egypt Mosque Visit Is Actually Photo From Mumbai Reality Check
नरेंद्र मोदींचा मुसलमानांच्या गोल टोपीतील लुक; इजिप्तची मशिद नव्हे तर मुंबईतील आहे फोटो, फरक इतकाच की…
airport
पुणे: शेगावसाठी अकोला विमानतळ सुरू करा! मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पुणे : फक्त महिला पोलीस करणार वाहतूक नियमन
Gulki Joshi found love on dating app
३४ वर्षीय अभिनेत्रीला डेटिंग अ‍ॅपवर सापडला जोडीदार; म्हणाली, “काही लोकांनी मला…”
students revealing the contents of their lunch boxes
Viral Video: ‘जिलेबी देणाऱ्या आईला भेटायचंय…’ चिमुकल्यांच्या डब्यातील पदार्थ पाहून तुम्हीही व्हाल थक्क; म्हणाल, ‘आमच्या वेळी…
3 boys riding a bike collided with the divider and fell down 2 boys death 1 injured watch horrifying bike accident viral video
काळजात धडकी भरवणारा अपघात! बाईकवरून तिघे सुस्साट आले अन् डिव्हायडरला धडक देत थेट…; थरकाप उडवणारा VIDEO

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सोनाली गुरवचा एक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी सोनालीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सोनाली गुरवने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहिता कलम ५००, माहिती आणि तंत्रज्ञान कायदा कलम ६५,६६ सी, ६७ ए या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
आणखी वाचा : “ही वेळ आपल्या घरच्या मुलीवरही येऊ शकते”, प्रसिद्ध इन्स्टा स्टारची व्हायरल अश्लील व्हिडीओप्रकरणी पोलिसांत धाव, म्हणाली “लोकांना मजा मारायला…”

या प्रकरणानंतर सोनालीने इन्स्टाग्रावर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये तिने व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांना जाब विचारला आहे. तसेच तिने या संपूर्ण प्रकरणावर संतापही व्यक्त केला आहे. या पोस्टनंतर तिला अनेकांनी पाठिंबा दिला आहे. त्याबद्दल तिने आभार मानले आहेत.

“तुमचं सगळ्यांचं एवढं प्रेम… काय बोलू मी… गुन्हेगारांना लवकरच शिक्षा होणार, इतर सगळ्याचं गोष्टी मी तुम्हा सगळ्यांबरोबर शेअर करेन”, असे सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे म्हटले आहे.

सोनाली गुरव पोस्ट

आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकार २५ वर्षांपूर्वी कसे दिसायचे? फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

दरम्यान सोनालीने शेअर केलेली इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिच्या या पोस्टला अनेकांनी पाठिंबा दिला आहे. सोनालीच्या या पोस्टवर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.

Story img Loader