प्रसिद्ध साऊथ कोरियन अभिनेत्री यू जो यूनने २९ ऑगस्टला आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. २७ वर्षीय अभिनेत्रीच्या निधनाची माहिती तिच्या कुटुंबियांनी प्रसारमाध्यमांना दिली. यासोबतच आत्महत्येपूर्वी यू जो यूनने पालकांसाठी लिहिलेली सुसाइड नोटही तिच्या कुटुंबियांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. या नोटमध्ये तिने तिचे आई- वडील, आजी आणि मोठ्या भावाची माफी मागितली आहे. यासोबतच तिने आत्महत्येचं कारणही स्पष्ट केलं आहे.
आत्महत्येपूर्वी यू जू यूनने कुटुंबियाची माफी मागणारी नोट लिहिली होती. या नोटमध्ये तिने लिहिलं, “मला अशाप्रकारे जात असल्याचं दुःख आहे. माझे आई- बाबा, आजी आणि मोठ्या भावासाठी दुःख होतंय. माझं हृदय मला ओरडून सांगतंय की मला जगायचं नाही. माझ्याशिवाय तुमच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण होऊ शकते. पण तुम्ही खंबीरपणे जगा. मी प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवणार आहे. रडू नका. मी जे पाऊल उचलतेय त्याने तुम्हाला त्रास होईल पण खरं सांगू तर मी अजिबात दुःखी नाही. मी खंबीर आणि शांत आहे. मी या गोष्टीबद्दल बराच काळ विचार केला आहे. त्यामुळे मला असं शांत जाणवतंय. मी माझ्या हक्काचं सुखी जीवन जगले आहे. माझ्यासाठी ते पुरेसं आहे. तुम्ही कोणतीही खंत न करता जगा.”
आणखी वाचा-“बिग बॉसनंतर मला बलात्काराच्या धमक्या…” जास्मिन भसीनचा खळबळजनक खुलासा
यू जो यूनने या नोटमध्ये पुढे लिहिलं, “मी मेलेली नाही. त्यामुळे सर्वांना खुश राहा. मला आशा आहे की माझ्या अंत्यसंस्कारांसाठी खूप लोक येतील. मी कठीण काळातून जातेय. मला वाईट अभिनय करायचा नव्हता. माझ्यासाठी अभिनयच सर्वकाही होता. अर्थात अभिनेत्री म्हणून जगणं माझ्यासाठी सोप्पं नव्हतं. मला आणखी काहीच करायचं नव्हतं. तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुमच्याकडे असणं आशीर्वादासारखं असतं. पण मला जाणवलं की तीच गोष्ट माझ्यासाठी शाप ठरत आहे.”
यू जो यूनने या नोटच्या अखेरच्या भागात तिला वेळोवेळी समजून घेणाऱ्या आई- वडिलांचे आभार मानले आहेत. तसेच कुटुंबियांच्या प्रती प्रेम व्यक्त केलं आहे. यू जो यूनच्या कामाबद्दल बोलायचं तर ती ‘Big Forest’ आणि ‘Joseon Survival Period’ या लोकप्रिय के-ड्रामामध्ये दिसली होती.