लहानमुले ही देवघराची फुले अशी आपल्याकडे म्हण आहे. प्रत्येकजण आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत असतात. १४ नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने अनेकजण आपल्या लहानपणीचे जुने फोटो शेअर करताना दिसून येतात. सामान्य माणसांप्रमाणे आता सेलिब्रेटी लोकदेखील आपले जुने फोटो शेअर करताना दिसून येतात.
प्राजक्ता माळीप्रमाणे आणखीन एका मराठी अभिनेत्रीने आपल्या लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. ही अभिनेत्री आहे मानसी नाईक. मागच्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. आपल्या डान्समधून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नुकताच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तीच संपूर्ण कुटुंब दिसत आहे. ‘अलमारी से निकल बचपन के खिलोने मुझे ऐसे देखकर बोले तुम्हे ही शौक था बडे होने का’, अशा शब्दात तिने आपल्या कुटुंबाची ओळख करून दिली आहे.
‘धर्मवीर’साठी प्रसाद ओकला मिळाला ‘हा’ मोठा पुरस्कार! पोस्ट शेअर करत म्हणाला, “माझं भाग्य…”
मानसीने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामुळे तिच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याचं बोललं जात आहे. या पोस्टमुळे पुन्हा एकदा तिच्या वैवाहिक आयुष्यातील वादाच्या चर्चांना उधाण आलं आहे. मानसी नाईक आणि तिच्या पतीमध्ये वाद सुरू असल्याचं बोललं जात आहे. मानसीने प्रियकर प्रदीप खरेरासोबत लग्नगाठ बांधली आहे. प्रदीप खरेरा हा एक बॉक्सर असून एक मॉडेलदेखील आहे.
तिची ‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ ही गाणी तुफान गाजली. त्यामुळे मानसी नाईक हे नाव घराघरात पोहोचलं आहे. तिचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. तिने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे.