आपल्या मजेशीर रील्समुळे चर्चेत असणारा प्रसिद्ध सोशल सोशल मीडिया स्टार डॅनी पंडितने एक आनंदाची बातमी दिली आहे. मराठमोळ्या डॅनीने आयुष्यात नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. डॅनी लग्नबंधनात अडकला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर लग्नातील फोटो शेअर करून ही बातमी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॅनी पंडितचे खरे नाव मुकेश पंडित आहे, पण तो सोशल मीडियावर डॅनी याच नावाने ओळखला जातो. डॅनीने लग्नगाठ बांधली आहे. त्याच्या पत्नीचे नाव नेहा कुलकर्णी आहे. नेहाच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवरील माहितीनुसार, ती व्हीएफएक्स आर्टिस्ट आहे.

हेही वाचा – Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो

‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ असं कॅप्शन देत डॅनीने लग्नातील फोटो शेअर केले आहेत. लग्नासाठी डॅनी व नेहा दोघांनीही पांढऱ्या रंगाचे नक्षीकाम केलेले पोशाख निवडले होते. या फोटोंमध्ये दोघेही सुंदर दिसत आहेत. डॅनी पंडितने लग्नाचे फोटो शेअर केल्यावर त्याच्यावर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. चाहते त्याला नवीन प्रवासासाठी कमेंट्स करून शुभेच्छा देत आहेत.

हेही वाचा – Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”

पाहा फोटो-

मराठमोळ्या डॅनीचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. अतरंगी रॅपर, टिपिकल पुणेरी मुलगा, जादूगर मोहन अशी वेगवेगळी पात्रं साकारून डॅनी लोकप्रिय झाला. इन्स्टाग्राम रील्समधून घराघरात पोहोचलेला डॅनी हा वकील आहे. त्याने बी. कॉम आणि एलएलबीबरोबरच कंपनी सेक्रेटरीचंही शिक्षण घेतलेलं आहे. डॅनी महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय कंटेंट क्रिएटर्सपैकी एक आहे. त्याच्या रील्सचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत. त्याच्या स्टेज शोसाठी चाहते गर्दी करतात.

हेही वाचा: “नंदिताने तिचे बोट माझ्या ओठांवर…”, ‘फायर’ चित्रपटातील इंटिमेट सीनबद्दल शबाना आझमी म्हणाल्या, “ते काही रोमँटिक…”

डॅनी अनेक मराठी कलाकारांबरोबर काम करतो. त्याने रितेश देशमुख, जिनिलीया देशमुख यांच्यासह अनेक मराठी सिनेस्टार्सबरोबर काम केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Famous marathi social media star danny pandit got married to neha kulkarni wedding photos out hrc