ब्रिटीश सुपरमॉडेल नाओमी कॅम्पबेलचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. आता नाओमीने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. त्याबद्दल तिने अधिक माहिती एका मुलाखतीत दिली आहे. नाओमीने वयाच्या ५० व्या वर्षी एका मुलीला जन्म दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘नो फिल्टर्स विथ नाओमी’ या कार्यक्रमात फॅशन डिझायनर डायान वॉन फर्स्टनबर्गने हजेरी लावली होती. त्यावेळी त्या दोघांनी अनेक गोष्टींवर चर्चा केली. त्यावेळी नाओमीसाठी लॉकडाउनचा काळ कसा होता हे तिने सांगितले. “लॉकडाउनचा काळ माझ्यासाठी खूप सुंदर होता आणि लॉकडाउनमध्ये मी एका मुलीला जन्म दिला,”असे नाओमी म्हणाली. डियान वॉन यांनी लगेच यावर नाओमीला प्रश्न विचारला, “आई होण्याचा निर्णय कसा घेतला?” या प्रश्ननावर उत्तर देतं नाओमी म्हणाली, “३० वर्षांची होई पर्यंत काय करावे हे मला समजलेच नाही.”

नाओमीने या मुलाखतीत मुलीला जन्म कधी दिला हा खुलासा केला नाही. मात्र, एवढं सांगितलं की मुलीचा जन्म हा करोना व्हायरसमुळे लागु करण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये झाला आहे.

आणखी वाचा : खुद्द आदित्य नारायणनेच केला इंडियन आयडलचा पर्दाफाश

नाओमीने पुढे सांगितले की, “सुरुवातीला तिने अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला होता, परंतु नंतर तिने आयव्हीएफद्वारे आई होण्याचे ठरवले. आई झाल्यानंतर नाओमीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर करत तिच्या मुलीचा एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोवर कमेंट करत सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी नाओमीला शुभेच्छा दिल्या होत्या.