प्रसिद्ध गायिका आशा भोसले या अनेकदा काही ना काही कारणांमुळे चर्चेत आहे. आशा भोसले यांचा चिरतरुण आवाज आणि तेवढाच सळसळता उत्साह याने रसिक प्रेक्षकांना अनेक वर्ष भारावून टाकले आहे. आशा भोसले यांचा फार मोठा चाहता वर्ग आहे. आशा भोसले यांनी नुकतंच त्यांच्या दुबईच्या हॉटेलमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्या स्वयंपाकघरात काम करताना पाहायला मिळत आहे. आशा भोसले यांची नात जनाईने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आशा भोसले या गाण्याव्यतिरिक्त स्वयंपाक करण्यातही पारंगत आहेत. त्यांची दुबई, कुवेत, अबू धाबी, दोहा, बहरेन यांसारख्या अनेक ठिकाणी हॉटेल आहेत. “आशाज” असे त्यांच्या दुबईतील हॉटेलचे नाव आहे. आशा भोसले यांच्या नातीने त्यांच्या दुबईतील ‘wafi’ या मॉलमधील “आशाज” हॉटेलमधील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला जनाई ही त्या हॉटेलची झलक दाखवताना दिसत आहे. यात आशा भोसले या स्वंयपाकघरात चक्क शेफचे कपडे परिधान करुन काम करताना दिसत आहेत.
“पिझ्झा खाण्यापेक्षा भाकरी खा”, आशा भोसले यांचा महिलांसाठी कानमंत्र
यात आशा भोसले यांनी खमंग दम बिर्याणी बनवली आहे. ही बिर्याणी तयार झाल्यानंतर त्या छान ती सर्व्ह करतानाही दिसत आहेत. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला आशा भोसलेंनी ‘आओ ना, गले लगालो ना’ हे गाणे वाजताना दिसत आहेत. त्यासोबतच त्याला कॅप्शन देताना ‘दुबई येथील आशाज रेस्टॉरंटमध्ये मला येऊन भेटा’ असेही म्हटले आहे. त्यासोबत त्यांनी #DUBAI #20YEARS, #ASHA’S, WAFI असे कॅप्शनही वापरले आहेत.
आशा भोसलेंनी शेअर केला लतादीदींसोबत बालपणीचा ‘तो’ फोटो, म्हणाल्या…
आशा भोसले यांनी जवळपास २० वर्षांपूर्वीच रेस्टॉरंट व्यवसायात प्रवेश केला. त्यांच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत यश मिळवल्यानंतर भारतातही आपल्या रेस्टॉरंटची साखळी उघडली आहे. त्यांनी त्यांचे सर्वात पहिले हॉटेल दुबईत सुरु केले होते. त्यांच्या या हॉटेलचे अनेक व्हिडीओ फोटो कायमच चर्चेत असल्याचे पाहायला मिळतात.